नांदेड : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत शिक्षक पात्रता परीक्षा महाटेटचे आयोजन रविवार दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रोजी जिल्ह्यातील 34 केंद्रावर करण्यात आले होते. जिल्ह्यातील 34 केंद्रावर 18,713 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. हे प्रमाण एकूण परीक्षार्थीच्या 93% होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी माधव सलगर, योजना शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे,उपशिक्षणाधिकारी संतोष शेटकार, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र पाचंगे,येरपूरवार, सुरेश जाधव यांनी विविध परीक्षा केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली.
प्राथमिक स्तर परीक्षेचा पेपर सकाळी 10.30 ते 1 आणि उच्च प्राथमिक स्तरासाठीचा पेपर दुपारी 2.30 ते 5 या वेळात झाला.परीक्षा केंद्रावर बायोमेट्रिक उपस्थिती फेस स्कॅनिंग केली. सर्व स्क्रीनिंग करून परीक्षेसाठी उमेदवारांना सोडण्यात आले.
जिल्ह्यात पेपर 1 साठी 8471 उमेदवार होते. त्यापैकी 7914 परीक्षार्थींनी तर पेपर 2 साठी 11,545 उमेदवार होते. त्यापैकी 10, 799 उमेदवारांनी परीक्षा दिली. एकूण 20,015 उमेदवारांपैकी 18,713 जणांनी परीक्षा दिली.
परीक्षेसाठी पद्माकर कुलकर्णी, संजय भालके,आकाश गाडगेराव,अनिल कांबळे आदींनी नियोजनात परिश्रम घेतले.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी परीक्षेची परीक्षा पारदर्शी आणि व्यवस्थित पार पाडण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याबाबत स्वतः लक्ष घातले होते. तसेच आज त्यांनी यशवंत कॉलेज येथील परीक्षा केंद्रावर व इतर काही केंद्रावर भेटी देऊन पाहणी केली आणि प्राथमिक शिक्षण विभाग व शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांच्या नियोजनाबद्दल समाधान व्यक्त केले.




No comments:
Post a Comment