किनवट : किनवट विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी करिता कुलधीर सिंघ (एस.सी.एस.) यांची मतमोजणी निरिक्षक म्हणुन निवडणूक आयोगाने नियुक्ती केली आहे.
मा. भारत निवडणूक आयोगाच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी दि. 15 ऑक्टोबर, 2024 रोजी कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. त्याअनुषंगाने दि. 20 नोव्हेंबर, 2024 रोजी मतदान पार पडले असुन दिनांक 23.11.2024 रोजी मतमोजणी होणार आहे.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गोकुंदा ता. किनवट येथे मतमोजणी होणाऱ्या 83- किनवट विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी प्रक्रियेसाठी मा. भारत निवडणूक आयोगाने मा. श्री. कुलधीर सिंघ (एस.सी.एस.) यांची मतमोजणी निरिक्षक म्हणुन नियुक्ती केली आहे. त्यांचा ECI Code- S-17727 हा असुन भ्रमणध्वनी क्र. 9728600026 असा आहे. मा. श्री. कुलधीर सिंघ (एस.सी.एस.) मतमोजणी निरिक्षक यांनी 83- किनवट विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीच्या तयारीबाबत पाहणी केली. तसेच मा. श्री. कुलधीर सिंघ (एस.सी.एस.) मतमोजणी निरिक्षक हे दि. 23/11/2024 रोजी होणा-या मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी कक्ष, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गोकुंदा ता. किनवट येथे उपलब्ध राहणार आहेत. ज्या उमेदवारांना व त्यांच्या प्रतिनिधींना मतमोजणी प्रक्रियेसंदर्भात काही अडीअडचण असल्यास प्रत्यक्ष अथवा त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधु शकतात. असे 83- किनवट विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कावली मेघना (भाप्रसे) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
No comments:
Post a Comment