महायुतीसाठी 'हे' 5 मुद्दे ठरले गेम चेंजर! मविआच्या पराभवावर शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे काय म्हणाल्या? - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, November 23, 2024

महायुतीसाठी 'हे' 5 मुद्दे ठरले गेम चेंजर! मविआच्या पराभवावर शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे काय म्हणाल्या?

 


मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी मतदान हे 20 नोव्हेंबर रोजी घेण्यात आलं होतं. संपूर्ण राज्यात 66.05 टक्के एवढं मतदान झालं होतं. ज्यानंतर आज (23 नोव्हेंबर) या निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहेत. सध्या समोर आलेल्या कलांनुसार राज्यात महायुती आघाडीवर दिसते आहे. 100 पेक्षा जास्त जागांवर आता महायुती पुढे आल्याचं दिसतंय. अशातच एका वाहिनीवर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. त्यांनी महायुतीसाठी गेम चेंजर आणि मविआच्या वाट्याला पराभव आणणाऱ्या काही मुद्द्यांबद्दल सविस्तर सांगितलं आहेत.


महायुतीसाठी गेम चेंजर ठरणारे ते मुद्दे कोणते?


शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, 'जे-जे प्रश्न समोर दिसले आणि त्यामध्ये तातडीने निर्णय घेण्याची गरज होती ते सरकारने घेतले. याचं उदाहरण जर पाहायचं झालं तर, सोयाबीनचा मुद्दा... सरकारने सोयबीनला 4892 रूपये दर दिला. त्यात 15 टक्के जरी मॉयस्टर असलं आणि अगदी किलोभर जरी असलं तरी ते शेतकऱ्यांकडून खरेदी होईल हा निर्णय घेतला.


त्याचबरोबर शेतकऱ्यांना 10 युनिट्सपर्यंत वीजबील माफी सरकारने केली. तिसरं म्हणजे, जेष्ठ नागरिक, सिंचन प्रकल्प, अवकाळी पावसाने झालेलं नुकसान या सर्वात 15 हजार कोटींची मदत केली. अगदी गोगलगायीपासून होणाऱ्या नुकसानीची भरपाई देण्याचा ऐतिहासिक निर्णय सरकारने घेतला.  


त्यामुळे मुद्दा असा आहे की, हे सगळं करत असताना जे लोकांचे प्रश्न आहेत त्यांना सामोरे जाण्याचं काम जसं आम्ही केलं, तसं माझं निरिक्षण असं आहे की, जो काही नेत्यांबद्दल जातीय प्रचार झाला तो समाजातल्या बऱ्याचशा घटकांना आवडलेला नाहीये. विशेषता देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल जातीय प्रचार करण्यात आला. 


दुसरं महत्त्वाचं म्हणजे, समर्थ रामदास स्वामींसारखे व्यक्तीमत्त्व की, ते शिवाज महाराजांचे गुरू आहेत की नाही? यावर कोणाचा वाद असेल... पण ते एक संत आहेत. त्यांच्याबद्दल वाटेल त्या शब्दात सोशली ट्रोल केलं जातं. मोठ-मोठे नेते बोलतात त्याच्यावर नावं घेऊन आणि मौन राहतात. उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीचे सगळे घटक मौन ठेवतात. काही लोकांनी तर त्यांच्याबद्दल अपशब्दही वापरले. हे सुद्धा लोकांना आवडलेलं नाही. 'बटेंगे तो कटेंगे'मुळे लोक आले असं म्हणणं म्हणजे मी म्हणेन दिशाभूल होईल. 


यामागील कारण म्हणजे, जो मध्यम वर्ग आम्ही बाहेर पडलेला पाहिला तो 2014 ला मोदींना परत पंतप्रधान करायचं याच विचारांचा असणारा मध्यम वर्ग सकाळी 7 वाजता उतरलेला दिसला. तो काही पैशाच्या प्रभावाने आलेला नव्हता.' असं शिवसेना नेत्या तथा उपसभापती नीलम गोऱ्हे यावेळी म्हणाल्या. 


महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले आहे. सर्व एक्झिट पोलचे निष्कर्ष खोटे ठरवत महायुतीने जोरदार मुसंडी मारली आहे. महायुतीच्या या यशात एकनाथ शिंदे सरकारने आणलेल्या पाच योजनांचा मोठा वाटा आहे. त्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला राज्यातील जनतेने भरभरुन प्रतिसाद दिला. राज्यातील लाडक्या बहिणींनी महायुतीलाच मतदान केल्याचे दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीतील ट्रेंड फिरवण्यात महायुती सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, 'बटेंगे तो कटेंगे', 'एक है तो सेफ है' अशा घोषणा त्याचबरोबर, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना इंटर्नशिप योजना, अखिल भारतीय उलेमा बोर्डाचा फतवा या पाच महत्त्वाच्या गोष्टी कारणीभूत ठरल्या आहेत.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News