आम्ही पुन्हा नव्याने लोकांसमोर जाणार! -शरद पवार - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, November 24, 2024

आम्ही पुन्हा नव्याने लोकांसमोर जाणार! -शरद पवार



मंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राज्यातील सामाजिक ऐक्य अबाधित राहिले पाहिजे , असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी  केले. महाराष्ट्रातील विधान सभेच्या निवडणूक निकालानंतर शरद पवार पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते. आमच्यातून बाहेरून गेलेल्यांना चांगल्या प्रकारचे यश मिळाले. आमच्या अपेक्षेप्रमाणे निकाल लागला नाही. हा जनतेने दिलेला निर्णय आहे. तो आम्ही स्वीकारला आहे. विधानसभेत विरोधी पक्षनेता नसणार. लोकशाहीत ही गोष्ट चांगली नाही. आम्ही पुन्हा नव्या जोमाने उत्साहाने जनतेसमोर जाणार. अधिकृत माहिती शिवाय ईव्हीएम वर बोलणार नाही. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बटेंगे तो कटेंगे या गोष्टीमुळे मतांचे ध्रुवीकरण झाले. महायुतीने आपला कार्यक्रम प्रभावीपणे मांडला. मराठी ओबीसी मताचा ध्रुवीकरणाबद्दल अभ्यास करू असेही शरद पवार यांनी सांगितले. 

सीएम पदाचा चेहरा आधी जाहीर करणे गरजेचे वाटलं नाही. निकालानंतर कोर्टात जाण्याचा कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला नाही. बारामतीत कोणाला तरी उभं करणे आवश्यकच होते. माझा निर्णय चुकीचा नव्हता योगेंद्र पवार यांची व अजित पवार यांच्याशी तुलनाच होऊ शकत नाही.बारामतीतील निकाल अपेक्षित होता. मी घरी बसणार नाही. पुढच्या निवडणुकांमध्ये अधिक तयारीने व उत्साहाने सामोरे जाणार.व्होट जिहाद मध्ये धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न केला. आम्ही सत्तेत आल्यास योजना बंद होतील असे सांगितले गेल्या त्याचा परिणाम निकलावर झाला. तसेच बटेंगे तो कटिंगेच्या नारामुळे मतांचे धुर्वीकरण झाले. नवीन मुख्यमंत्रीपद सोहळ्यासाठी आपण लोकसभा आधिवेशनामुळे उपस्थीत राहू शकणार नाही असे शरद पवार यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News