नांदेड : दिव्यांगाना न्याय देण्यासाठी त्यांच्याअनेक सवलतीसाठी प्रशासनाचे लक्ष केंद्रित करण्यासाठी दि.३ डिसेंबर२०२४ दिव्यांग जागतिक दिनी बेरोजगार दिव्यांग कल्याणकृति समिती नांदेड व दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र जिल्हा नांदेडच्या वतीने आयोजिलेल्या आक्रोश मोर्चात सर्वांनी सहभागी व्हावे , असे आवाहन संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील यांनी केले आहे.
दिव्यांगाच्या न्याय हक्कासाठी नांदेडचे जिल्हाधिकारी यांनी दिव्यांग, वृध्द, निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचेलीकर यांच्या आंदोलनाची दखल घेऊन संबंधित अधिकारी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यां सोबत सात वेळा बैठक व आठव्या वेळी सुनावणी घेऊन दिव्यांगाना न्याय देण्याचा प्रयत्न करुन एकाही प्रश्नाला संबंधित अधिकारी न्याय देत नसल्यामुळे दि.३ डिसेंबर२०२४ दिव्यांग जागतिक दिनी बेरोजगार दिव्यांग कल्याणकृति समिती नांदेड व दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र जिल्हा नांदेड ने अनेक सवलतीसाठी शासन प्रशासन यांचे लक्ष केंद्रित करण्यासाठी अनेक सवलती हक्कासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पासुन जिल्हापरिषद नांदेड, . मार्गे महानगरपालिका नांदेड ते जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे संस्थापक अध्यक्ष राहुल साळवे, संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यातील सर्व दिव्यांग,वृध्द, निराधार बांधवांचा आक्रोश मोर्चात आयोजित केला आहे.
दिव्यांग बांधव संघटित नसल्यामुळे त्यांन संघर्ष करताना खुप त्रास होत असतानाही ते अनेक आंदोलने करीत असतात. पण वेगवेगळ्या संघटना असल्याने एकत्रित शक्ती दिसत नसल्यामुळे प्रशासन लोकप्रतिनिधी, त्यांच्या हक्कासाठी लक्ष देत नाहीत. सर्व सवलती फक्त कागदोपत्री राहात असतात. नुकतीच झालेल्या निवडणुकीत एकाही उमेदवाराने जाहिरनाम्यात किंवा जाहिर भाषणात उपेक्षित असलेल्या दिव्यांग, वृध्द निराधाराचा शब्दानेही उच्चार केला नाही. दिव्यांगाची गणती नसल्यामुळे संघटितपणे नसल्याने संघर्षात शक्ती निर्माण झालेली दिसत नाही त्यामुळे त्यांना न्याय हक्क मिळत नाहीत म्हणून सर्वांना जागे करण्यासाठी ३ डिसेंबर २०२४ रोजी दिव्यांग जागतिक दिनी काळा दिवस म्हणून आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. यात आपली शक्ती दाखविण्यासाठी बहुसंखेनं सहभागी व्हावे , असे आवाहन बेरोजगार दिव्यांग कल्याणकृति समिती नांदेड व दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र च्या वतीने राहुल साळवे, चंपतराव डाकोरे पाटील, सुधाकर पिलगुंडे,ज्ञानेश्वर नवले, राजाभाऊ शेरकुरवार, चांदराव चव्हाण मिंलिद चिगोटे,विद्याधर गिरी,ऊतम चिगोटे,चांदुगोरटकर, उमेश भगत,मगदुम शेख,अनिल रामदिनवार,दिंगबर लोणे इत्यादींनी केले आहे.




No comments:
Post a Comment