किनवट:भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा किनवट च्या वतीने किनवट येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सकाळी १० च्या सुमारास अनेक मान्यवरांच्या हस्ते डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी संस्कार सचिव बौद्धाचार्य अनिल उमरे व बौद्धाचार्य महेंद्र नरवाडे यांनी सामुदायिकरित्या वंदना घेतली. प्रारंभी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके,पीरिपाचे जिल्हाध्यक्ष विनोद भरणे, पीएम पोषण शक्ती निर्माण योजना अधिक्षक अनिलकुमार महामुने, प्राचार्या शुभांगीताई ठमके, उपप्राचार्य सुभाष राऊत,उप प्राचार्य प्रा.डॉ.पंजाब शेरे, प्राचार्य अंबादास जुनगरे,केंद्रप्रमुख उत्तम कानिंदे,वसंत सर्पे, देविदास मुनेश्वर, रुपेश मुनेश्वर, राहुल उमरे,सोमा पाटील, किसनराव ठमके,माजी नगराध्यक्ष के.मुर्ती,सेक्युलर मुव्हमेंट चे जिल्हाध्यक्ष ॲड.मिलिंद सर्पे, गंगुबाई परेकार,सुजाता कोल्हे,दशरथ पवार,प्रा.रविकांत सर्पे, ॲड.जी.एस. रायबोळे,माधव कावळे, सुरेश जाधव, पांडुरंग साळवे,कवी गायक शंकर सोनकांबळे क्रांती शरण केराम, बाळकृष्ण कदम,ॲड.सुनिल येरेकार,गोकुळ भवरे,राजेश पाटील, पोलीस निरीक्षक सुनिल बिर्ला,रवि कांबळे,सम्यक सर्पे,विनोद कदम,प्रा.डाॅ.आनंद भालेराव,फसीभाई, विवेक ओंकार, भीमराव पाटील,विनोद कदम , आनंदरश्मी कयापाक यांच्यासह विविध पक्ष व संघटनांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण अभिवादन केले.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन : ७५ च्या वर रक्तदात्यांनी केले रक्तदान
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कृतीशिल अभिवादन करण्यासाठी व 26/11 च्या आतंकी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस, वीर-जवानांना रक्तदान करून अभिवादन करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ शुक्रवारी(ता.6) सकाळी 10 वाजता रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.यात दुपारी दोन वाजेपर्यंत 50 च्या वर रक्तदात्यांनी रक्तदान केले. सायंकाळी 5 वाजेपर्यंत हा आकडा 75 त्यावर पोहचेल अशी माहिती माहिती युवा पॅंथर संघटनेचे अध्यक्ष ऍड.सम्राट सर्पे व सचिव निखिल कावळे यांनी दिली. शिबिराचे हे ७ वे वर्षे आहे. शिबिराचे आयोजन युवा नेते राहुल सर्पे यांच्या सौजन्याने करण्यात आले आहे.





No comments:
Post a Comment