बाल वैज्ञानिकांच्या अनोख्या प्रकल्पांनी किनवटमध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन गजबजले - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, December 25, 2024

बाल वैज्ञानिकांच्या अनोख्या प्रकल्पांनी किनवटमध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन गजबजले

 


किनवट : येथून जवळच असलेल्या गोकुंदा येथील  महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात विभागाच्या वतीने आयोजित 52 वे तालुकास्तरीय विज्ञान, गणित व पर्यावरण प्रदर्शन 2024-25 बाल वैज्ञानिकांच्या अनोख्या प्रकल्पांनी किनवटमध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन गजबजले. बालकांच्या  उत्स्फूर्त सहभागाने यशस्वीरित्या पार पडले.

       पंचायत समितीचे गट विकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव यांचे हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यावेळी गट शिक्षणाधिकारी गंगाधर राठोड, विस्तार अधिकारी(पंचायत) , कैलास गायकवाड विस्तार अधिकारी (शिक्षण) बालाजी मोकळे, संजय कराड, केंद्र प्रमुख उत्तम कानिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

     या प्रदर्शनामध्ये माध्यमिकचे 11 व प्राथमिक विभागाचे 37 असे एकूण 48 प्रकल्प सामील झाले होते. या पैकी प्राथमिक गटातून  शुभम शिवाजी मोरे (महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, गोकुंदा) याच्या विद्युत निर्मिती प्रकल्पाने प्रथम , ऋत्विक जाधव  (ज्ञानज्योती पोदार लर्नस् स्कूल , बेंदी ) याच्या स्मार्ट फॉर्मिंग प्रकल्पाने दुसरा , विश्वजित सुनिल कांबळे (जि.प.प्रा.शा. वझरा बुद्रूक ) याच्या नैसर्गिक शेती प्रकल्पाने तिसरा व प्रतिक अमोल काटोके ( एकलव्य मॉडेल रेसिडेंसिएल स्कूल , सहस्त्रकुंड) याच्या भूकंप सूचक यंत्र प्रकल्पाने चौधा क्रमांक पटकावला.

     माध्यमिक गटातून मनिष हरिष मठावत (महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, गोकुंदा) याच्या वन्य प्राण्यांपासून संरक्षण या प्रकल्पाने प्रथम, ओंकारेश्वर दत्ता राठोड ( मातोश्री कमलताई ठमके इंग्लिश मीडियम स्कूल , गोकुंदा ) याच्या बनाना सिरप या प्रकल्पाने दुसरा , आदित्य विजय कोल्हे (सरस्वती विद्या मंदीर माध्यमिक शाळा , किनवट ) याच्या हायड्रॉलिक ब्रिज ) या प्रकल्पाने तिसरा व तलहा खान (ज्ञानज्योती पोदार लर्नस् स्कूल, बेंदी ) याच्या संसाधन व्यवस्थापन प्रकल्पाने चौथा क्रमांक पटकावला. या सर्व  प्रकल्पांची निवड जिल्हास्तरीय प्रदर्शनासाठी करण्यात आली आहे. प्रा. विजय कांबळे , ममता देशमुख व एस.बी. आहेर यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले.

     या विज्ञान प्रदर्शनाच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापक अंबादास जुनगरे यांच्या मार्गदर्शनाखाली उप प्राचार्य राधेश्याम जाधव, उप मुख्याध्यापक पी.जी. मुनेश्वर , पर्यवेक्षक संतोष बैसठाकूर, रघुनाथ इंगळे, के.जी. डांगे, एस.डी .सूर्यवंशी, विज्ञान  शिक्षक  जी.के .श्रीमंगल, एस. एच .पाटील, संदेश भरणे, अंजली हलवले , गणित शिक्षक सुरेश इटकेपेल्लीवार , मनोज भोयर , कृष्णा तुम्मलवारवार यांचे सह सर्व शिक्षके कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. प्रज्ञा पाटील व सतीश विणकरे यांनी सूत्रसंचालन केले. श्याम जायभाये यांनी आभार मानले .


" शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान या मुख्यविषयावर आधारित हे प्रदर्शन सध्याच्या अन्न , आरोग्य , स्वच्छता , नैसर्गिक शेती , वाहतूक व दळणवळण या समस्यांवर उपायोजना करण्यास बाल वैज्ञानिकास चालना देणारे आहे. "

- पुरुषोत्तम वैष्णव , गट विकास अधिकारी, पं.स.,

किनवट


" वैज्ञानिक जाणिवांना प्रसृत करण्यासाठीची सृजनशिलता बाल वैज्ञानिकात वृधिंगत व्हावी सासाठी हे  प्रदर्शन आहे.

-गंगाधर राठोड ,

गट शिक्षणाधिकारी , पं.स. , किनवट

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News