नांदेड : सामाजिक , शैक्षणिक व प्रशासकीय अशा विविध क्षेत्रात दैदिप्यमान कार्य करणाऱ्या मान्यवरांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान नांदेडच्या वतीने देण्यात येणारे राज्यस्तरीय समता गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले असून हिमायतनगर तालुक्यातील सोनारी फाटा येथे शुक्रवारी (ता.24 जानेवारी 2025) होणाऱ्या 8 व्या बौद्ध धम्म परिषदेत वितरण होणार असल्याची माहिती निवड समितीचे प्रमुख डॉ. प्रमोद अंबाळकर, डॉ. पुंडलीक नामवाड, प्राचार्य प्रताप नरवाडे, सुशीलकुमार भवरे यांनी दिली.
पुरस्कारासाठी निवड झालेले मान्यवर : ऍड. विजय गोणारकर, प्रा.डॉ. अनंत राऊत (नांदेड), अभियंता एस.एस. जवळेकर, पी.डी. गायकवाड, वंदना सुर्वे, पी.एन. डोंगरे, निवृत्त मुख्याध्यापक राजाराम वाघमारे (किनवट), डॉ. रेखाताई चव्हाण, पत्रकार श्याम पुरभाजी कांबळे, आदित्य कांबळे, जयप्रकाश वाघमारे, शिवप्रसाद मठवाले (कळमनुरी), उद्धव मोकळे, अभि. दिलीप धुळेकर, पत्रकार हमीदखाँ पठाण (भोकर), संजय निवडंगे, डॉ. सचिन जाधव (आ. बाळापूर), रोहितसेठ शास्त्री अडकटलवार, गणेशराव कदम दिघीकर, पत्रकार गौतम वाठोरे.
धम्म परिषदेचे उद्घाटन खा. नागेश पाटील आष्टीकर यांच्या हस्ते होणार असून परिषदेच्या अध्यक्षस्थानी मा. आ. माधवराव पाटील जवळगावकर हे राहतील. स्वागताध्यक्ष म्हणून प्रा.डॉ. मोहन मोरे, सहस्वागताध्यक्ष रफिकभाई शेठ, निमंत्रक कैलासभाऊ माने, जोगेंद्र नरवाडे कामारीकर, सुधाकर पाटील सोनारीकर, बालाजी राठोड तर विशेष अतिथी म्हणून माजी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती सुर्यकांताताई पाटील , मा.ना. हेमंतभाऊ पाटील, खा. रविंद्र चव्हाण, मा.खा. सुभाषराव वानखेडे, आ. बाबुराव कदम कोहळीकर, आ. भीमराव केराम, आ. बालाजीराव कल्याणकर आदी मान्यवरांसह उप विभागीय अधिकारी अविनाश कांबळे, अति. मुकाअ. एस.जी. माळोदे, प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, उपविभागीय पोलिस अधिकारी शफाकत अमना, सहाय्यक वनसंरक्षक बी.एन. ठाकुर, तहसीलदार पल्लवीताई टेमकर, पोलीस निरीक्षक अमोल भगत, के.डी. देशमुख, मंगेश दादा कदम यांची उपस्थिती लाभणार आहे.
या एकदिवसीय बौद्ध धम्म परिषदेकरीता संयोजन समितीचे अध्यक्ष त्रिरत्नकुमार मा. भवरे, डॉ. मनोज राऊत, कानबा पोपलवार, अनिल मादसवार, लक्ष्मणराव मा. भवरे, आनंदा जळपते, शिवाजी डोखळे, नागोराव मेंडेवाड, अविनाश कदम, परमेश्वर वालेगावकर, जळबा जळपते, केशव माने, डॉ. किशोर भगत, किरण वाघमारे, पांडूरंग मिरासे, नागनाथ वच्छेवार, जयभीम पाटील, शेख खयुम आदी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
No comments:
Post a Comment