डॉ.कैलास कानिंदे रेणापूरकर यांना विश्वरत्न सम्मान पुरस्कार प्रदान - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, January 6, 2025

डॉ.कैलास कानिंदे रेणापूरकर यांना विश्वरत्न सम्मान पुरस्कार प्रदान

 


भोकर : येथील तालुक्यातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, पत्रकारिता, आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन करणारे डॉ.कैलास गणपतराव कानिंदे यांना त्यांच्या कार्याचा आढावा घेऊन पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला वर्थी वेलनेस फाउंडेशनचे संस्थापक सोमया बाजपाई व सह संस्थापक हर्षित बाजपाई यांनी विश्वरत्न सम्मान पुरस्कार नुकताच प्रदान करून सन्मानित केले आहे.

     वास्तविक पाहता भोकर तालुक्यातील मौजे रेणापूर सारख्या ग्रामीण भागात राहून त्यांनी उच्च शिक्षण घेतले आहे. नेट ( युजीसी ), पीएच.डी.(स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठ, नांदेड), डी.सी.बी.एम.डी. (डॉ.बा.आं.म.विद्यापीठ औरंगाबाद) पदव्या मिळविल्या आहेत. ग्रामीण भागाशी नाळ जूटलेला समाजसेवेसाठी धावून जाणारा व्यक्ती पाहावयास मिळतो. समाजात वावरत असतांना गरीबांना मदतीचा हात म्हणून सतत प्रयत्नशील असतो. वर्ल्ड व्हीजनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शाळेतील मुलांना बॅग, वही, पेन, डब्बा, खाऊ, धान्य, कुपोषित मुलांना मदत, शेतकऱ्यांना शेती विषयक अवजारे, शेळ्या मिळवून दिल्या. तसेच व्यवसाय करण्यासाठी साहित्य व आर्थिक निधी उपलब्ध करून दिले. त्याचबरोबर राजकारणातही वेगळा दबदबा व ठसा उमटविला आहे. भोकर तालुक्यातील दहा गावात उपसरपंचावर कारभार चालत होता. त्या गावांना सरपंच पद मिळवून देण्यासाठी शासन प्रशासनाशी वेळोवेळी पाठपुरावा करून त्यांनी सरपंच पद मिळवून दिले. तसेच शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचे मोलाचे मार्गदर्शन दिशादर्शकासारखे अनेकांना लाभले.            

     स्वतःविद्याविभूषित असल्यामुळे त्यांचे मार्गदर्शन मार्गदात्यासारखे होते. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन कार्य करून वंचित, शोषित, पिडीत घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी व विविध समस्यांना वाचा फोडण्याचे कार्य केले. 50 च्यावर पुस्तक संपादित केले आहेत. संशोधन करतांना प्रत्यक्ष भेटी देऊन आज आंतरराष्ट्रीय  स्तरावर 100 च्यावर लेख प्रसिद्ध केले. 250 च्यावर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभाग नोंदविला तसेच पत्रकारिता क्षेत्रात 2013  पासून   कार्यरत आहेत. संपादक, प्रकाशक, मालक, कार्यकारी संपादक पदावर कार्यरत आहेत. आज पत्रकारिता क्षेत्रात आगळी वेगळी ओळख आपल्या लेखणीच्या माध्यमातून निर्माण केली आहे. म्हणूनच त्यांच्या अष्टपैलू कार्याचा आढावा घेऊन विश्वरत्न सन्मानाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हासह तालुक्यात कौतुक होवुन अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News