किनवट : जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या आदेशान्वये येथील पोलीस स्टेशनात प्रमुख कायद्याच्या बदलाची अंमलबजावणी संदर्भात कार्यशाळा संपन्न झाली.
यावेळी पोलीस निरीक्षक सुनिल बिर्ला , ऍड विलास सूर्यवंशी , ऍड. एस. एम. सर्पे यांची प्रमुख उपस्थिती होती.
भारतीय दंड संहिता, भारतीय न्याय संहिता तसेच फौजदारी प्रक्रिया संहिता व भारतीय नागरिक सुरक्षा संहिता तसेच भारतीय साक्ष पुरावा कायदा व भारतीय साक्ष अधिनियम या प्रमुख कायद्याच्या बदलाची माहिती सर्वांना व्हावी या उद्देशाने व त्याची अंमलबजावणी व्हावी या संदर्भाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी ऍड. सूर्यवंशी यांनी या तिन्ही कायद्याचा फरक सांगितला व सध्याच्या किनवट मध्ये होणारे सायबर क्राईम कमी करण्यासाठी या तिन्ही कायद्याची उपयुक्तता सांगितली. झालेल्या तीन कायद्यामधील शब्दाच्या सहजतेमध्ये बदल व सुलभते बदल आपल्या अद्वितीय शैलीमध्ये श्रोत्यांना सांगून श्रोत्याच्या जीवनामध्ये अमुलाग्र बदल घडवून श्रोत्याने सध्याच्या किनवट पेक्षा शांततापूर्ण किनवट येणाऱ्या पिढीला द्यावे असे आवाहन त्यांनी केले. पोलीस पाटील यांनी आपले कार्यालयीन अभिलेखे तयार करावे. त्यामुळे शांतता निर्माण होण्यास मदत होते .किनवट तालुक्यात शांतता निर्माण करणे ही जबाबदारी पोलीस पाटलांचीच आहे. असेही ते म्हणाले.
सदर कार्यशाळे चे नियोजन पो. हे. का.सुभाष दोनकलवार व पो. हे. का बोधमवाड यांनी केले होते. या कार्यशाळेत तालुक्यातील पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्त आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment