किनवट : राष्ट्रीय सेवा योजनेतून श्रम संस्कार केले जातात. रासेयोतून विद्यार्थ्यांना सामाजिक समतेचे मूल्य शिकविले जातात असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.एस.के.बेंबरेकर यांनी केले.
दतकगाव मौजे भिलानाईक तांडा येथे युथ फार माय भारत व युथ फार डिजिटल लिटरसी' या मुख्य विषयांच्या अनुषंगाने बळीराम पाटील महाविद्यालयाचे वार्षिक विशेष युवक शिबीर आयोजित केल आहे. यावेळी ते बोलत होते.
प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधी व राष्ट्रनिर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी विचारमंचावर उपसरपंच गजानन पवार, सामाजिक कार्यकर्ते अशोक राठोड, प्रा. डॉ.आनंद भालेराव, प्रा.ममता जोनपेलीवार, जि.प.शाळेचे मुख्याध्यापक ए.एस.मुकाडे, सहशिक्षक वाकोडे आर.पी , श्रीमती दासेवार एस .व्हि , श्रीमती पेंटावार ए.के. यांची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना डॉ.बेंबरेकर असे म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजना ही सामाजिक सेवा करण्यासाठी मूल्य पेरत असते, आपल्या महाविद्यालयातील रासेयो विभागाने उत्कृष्ट रासेयो कार्यक्रम अधिकारी पुरस्कार मिळविलेला आहे. पुन्हा सामाजिक क्षेत्रातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी स्वयंसेवकांनी प्रयत्न करावेत असे मत व्यक्त केले. यावेळी डॉ.आनंद भालेराव यांनीही मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त रासेयो स्वयंसेवकांना शपथ देण्यात आली. रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. रासेयो स्वयंसेवकांनी प्रजासताक पथसंचालन करून सलामी दिली.
पंथसंचालनाचे प्रमुख विनायक पोतकंटवार व मुलीचे प्रतिनिधित्व अश्विनी झाडे, गंगासागर गोपुलवार यांनी केले.
उपप्राचार्य डॉ.पंजाब शेरे यांनी प्रास्ताविक व रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.शेषराव माने यांनी सूत्रसंचालन केले. महिला रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डाॅ. शुंभागी दिवे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी (क.म.) प्रा.डी.टी.चाटे, प्रा.डॉ रत्ना कोमावार यांनी परिश्रम घेतले. यावेळी बहूसंख्यने प्राध्यापक व रासेयो स्वयंसेवक सहभागी झाले होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.
No comments:
Post a Comment