किनवट, ता.३ : किनवट न्यायालय वकील संघाच्या बुधवारी (ता.२) झालेल्या बहुरंगी निवडणुकीत अध्यक्षपदी ऍड . किशोर मुनेश्वर, सचिवपदी ऍड.माज बडगुजर हे विजयी झालेत, तर कोषाध्यक्षपदी ऍड.सम्राट सर्पे यांची बिनविरोध निवड झाली.
अन्य पदाधिकाऱ्यांमध्ये उपाध्यक्षपदी ऍड.टेकसिंग चव्हाण व सहसचिवपदी ऍड.सुरेश मुसळे हे विजयी झालेत. ग्रंथपालपदी ऍड.विशाल कानिंदे यांची निवड करण्यात आली.येणाऱ्या काळात किनवट येथे अतिरिक्त जिल्हा न्यायालय इमारत प्रश्न प्रलंबित आहे. या सारखी अनेक आव्हाने आहेत. ती आव्हाने पेलण्यासाठी पूर्वी सचिव पदाचा अनुभव असणारे ऍड . किशोर मुनेश्वर यांना अभिवक्ता संघाने अध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे. वैयक्तिक पातळीवर तत्वशील , प्रेमळ व्यक्तिमत्व म्हणून ऍड. किशोर मुनेश्वर यांची ओळख आहे. त्यांचे समवेत कार्यकारिणीत जादातर तरुण वकीलांचा समावेश आहे . हे या कार्यकारिणीचे वैशिष्टये आहे.
विजयी उमेदवारांचा निवडणूक निर्णय अधिकारी ऍड.शंकर राठोड व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ऍड.सुनिल येरेकार यांनी विजयी प्रमाणपत्र देऊन व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. ही कार्यकारिणी दोन वर्षे कार्यरत राहील.
No comments:
Post a Comment