गिग, प्लॅटफार्म वर्कर व ॲग्रिगेटर यांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी -जिल्हाधिकारी राहुल कर्डिले - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, March 27, 2025

गिग, प्लॅटफार्म वर्कर व ॲग्रिगेटर यांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी -जिल्हाधिकारी राहुल कर्डिले




नांदेड, ता. 27 मार्च : केंद्र सरकारने वेगवेगळया ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी करण्यासाठी ई-श्रम पोर्टल सुरु केले आहे. तरी सर्व गिग कामगारांनी 1 एप्रिल 2025 पासून ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी. तसेच सर्व ॲग्रिगेटर यांनी 31 मार्च 2025 पर्यत या register.esharm.gov.in/#/iser/platform-worker-registration संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

ई-श्रम पोर्टलवर केंद्र शासनाने गिग वर्कर, प्लॅटफॉर्म वर्कर व ॲग्रिगेटर यांची नोंदणी करण्यास सुरवात केलेली आहे. साधारणत: गिग व प्लॅटफॉर्म वर्कर शेरिंग वाहन कामगार, अन्न व किराणा पुरवठा करणारे कामगार, लॉजिस्टीक सेवा देणारे कामगार इ. मार्केटमध्ये ऑनलाईन काम करणारे कामगार, फ्रोफेशनल सर्विस देणारे कामगार, हेल्थ केअर सेवा देणारे कामगार, ट्रॅव्हल्स व आदरातिथ्य करणारे कामगार, मिडीया सर्विसेस इ. सर्व प्लॅटफार्म गिग वर्करच्या व्याखेत येतात. ॲमेझोन, फ्लीपकार्ट, मिंत्रा, स्नॅपडिल, अजिओ, मिशो, स्विगी, झोमॅटो अशा वेगवेगळया ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर काम करणारे कामगार हे सर्व ई-श्रम esharm.gov.in वर नोंदीत होवू शकतील. केंद्र सरकारकडे डेटा तयार होईल म्हणून नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News