महामार्गावरील कमठाला, अंबाडी, निचपूर अशी गावे अवघड क्षेत्रात ? सार्वत्रिक बदल्यांसाठी घोषीत यादीस शिक्षकांचा आक्षेप - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, April 23, 2025

महामार्गावरील कमठाला, अंबाडी, निचपूर अशी गावे अवघड क्षेत्रात ? सार्वत्रिक बदल्यांसाठी घोषीत यादीस शिक्षकांचा आक्षेप

 




किनवट ( प्रतिनिधी ) : सार्वत्रिक बदल्या- २०२५ करिता बदली पोर्टलवर अवघड क्षेत्र यादी घोषित केली आहे. यामध्ये किनवट तालुक्यातील केवळ १६ गावांचा समावेश आहे. यापूर्वीच्या बदली प्रक्रियेत किनवट तालुक्यातील ३२ गावांचा समावेश होता. ज्या निकषाने ही ३२ गावे ठरवली होती त्यात अद्यापही फारसा बदल झालेला नाही. तरिही यावर्षीच्या अवघड क्षेत्र घोषित यादीत केवळ १६ गावांचा समावेश आहे. अतिदूर्गम गावे वगळून महामार्गावरील गावे अवघड क्षेत्र यादीत घोषित केल्याच्या कृतीला शिक्षक संघटनेने विरोध दर्शवून वेळप्रसंगी न्यायालयात जाण्याची परवानगी मागणारे निवेदन गट शिक्षणाधिकारी यांना दिले आहे. 

     मागील बदलीत नांदेड जिल्हयातील १६ तालुक्यातील ४८ अवघड क्षेत्र गावांची यादी घोषित केली होती. त्यानुसार तत्कालिन बदल्याही यशस्वीपणे पार पडल्या होत्या.

        वास्तविक आजही जी गावे अवघड क्षेत्रासाठी असलेल्या तीन पेक्षा जास्त निकषात बसत असून सुद्धा यावर्षी वगळण्यात आली. आणि काही गावे सुगम असतानाही अवघड क्षेत्राच्या यादीत घेण्यात आली. हे कुणी ? केव्हा ? कसे? सर्वेक्षण केले हे न उलगडणारेच कोडे आहे. जसे मुख्य रस्त्याला लागून असलेले घोटी गाव अवघड क्षेत्रात होते ते नवीन यादीत वगळले. पण राष्ट्रीय महामार्ग क्र. १६१ अ' ला लागून असलेले  कमठाला, तीन किमीच्या आत असलेले अंबाडी, बस सुविधा असलेली निचपूर, इंजेगाव, ही गावे अवघड क्षेत्रात घेतलीच कशी ?

       आजही भौतिक सुविधांपासून वंचीत असलेले डोंगरी, अतिदूर्गम, संवाद छायाप्रदेश, दिवसासुध्दा हिंस्त्र प्राण्यांचा उपद्रव असणारी गावे, सातत्याने संपर्क तुटणारी गावे, जसे पिंपळशेंडा, वसंतवाडी, प्रेमनगर भिमपूर, पिंताबरवाडी, शिवशक्तीनगर, धामनदरी, लक्कडकोट, जगदंबा तांडा, सिडामखेडा, रामपूरवाडी, भंडारवाडी, उमरवाडी, डोंगरगाव, दत्तनगर (मलकजाब तांडा), भूजंगनगर, पिंपरी, चंद्रपूरपाटी (सावरी), मोहाडा, टेंभी मजरा, सेवादास तांडा (शिवणी), बोरबन तांडा, यासारखी अनेक गावे अवघड  क्षेत्रातील निकष पूर्ण करत असतांना सुद्धा ही गावे अवघड क्षेत्रातून वगळण्यात आली. जीव मुठीत घेवून येथे दैनदिन कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांवर हा अन्याय आहे. 

     तेव्हा सक्षम अधिकाऱ्यांमार्फत प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून अवघड क्षेत्रांच्या गावांची यादी सुधारित करण्यात यावी. अशा आशयाचे निवेदन गटशिक्षणाधिकारी गंगाधर राठोड यांना नुकतेच देण्यात आले. यावेळी अवघड क्षेत्रातील शिक्षक संतोष दासरवार, विवेक पेगरलावार, अनिल गरुड, रुपेश मुनेश्वर, राजू भगत, बालाजी गरड, बाबासाहेब आढाव, भुजंग मेश्राम, श्रीहरी मुंडे यांच्यासह पुरोगामी शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष राजू बाविस्कर, इंडियन बहुजन टीचर्स असोसिएशनचे जिल्हा सरचिटणीस रमेश मुनेश्वर यांच्यासह अनेकांनी उपस्थित राहून निवेदनावर सह्या केल्या आहेत.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News