*बीड जिल्ह्यातील ऊसतोड महिला कामगारांच्या समस्या, महिला व बालकांच्या सुरक्षेच्या उपाययोजना, पाणीटंचाई, रोजगार हमी योजना, समस्या सोडवण्यासाठी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक* - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, April 22, 2025

*बीड जिल्ह्यातील ऊसतोड महिला कामगारांच्या समस्या, महिला व बालकांच्या सुरक्षेच्या उपाययोजना, पाणीटंचाई, रोजगार हमी योजना, समस्या सोडवण्यासाठी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक*

 



बीड, ( विशेष प्रतिनिधी उदय नरे ) : विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी अविनाश पाठक आणि पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्यासमवेत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत बीड जिल्ह्यातील ऊसतोड महिला कामगारांच्या समस्या, महिला व बालकांच्या सुरक्षेच्या उपाययोजना, पाणीटंचाई, रोजगार हमी योजना, तसेच विविध सामाजिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.


बैठकीत डॉ. गोऱ्हे यांनी ऊसतोड महिला कामगारांच्या समस्या, त्यांच्या मुलांच्या वसतिगृहांची स्थिती, आणि सॅनिटरी नॅपकिन्सची उपलब्धता याबाबत चिंता व्यक्त करत संबंधित यंत्रणांना तातडीने पावले उचलण्याचे निर्देश दिले.

त्याचप्रमाणे, काही बालगृहांची अनधिकृतता लक्षात घेता, "सर्व बालगृहांचे पत्ते एकसारखे असतील, तर ती मुले बाहेरून आणलेली असण्याची शक्यता लक्षात घ्या," असे स्पष्ट निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.


शाळांमध्ये गुड टच - बॅड टच विषयी मुलांना माहिती देणे आवश्यक असल्याचे सांगून, बालकांविरोधात वाढणाऱ्या अत्याचाराच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी उपाययोजना करण्याचा आग्रह त्यांनी धरला.


*पाणीटंचाई आणि नगर परिषदेची स्थिती*


जिल्ह्यातील पाणीटंचाई संदर्भातही चर्चा झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी ३१ जुलैपर्यंत पाण्याचे नियोजन झाल्याचे सांगितले. मात्र बीड नगर परिषदेची अत्यंत वाईट परिस्थिती असून, विहीर अधिग्रहण, टँकर व तात्पुरती नळ योजना यांचा प्रभावी वापर करण्याची गरज डॉ. गोऱ्हे यांनी अधोरेखित केली.


*रोजगार हमी योजनेचा आढावा*


जिल्ह्यातील रोजगार हमी योजनेत साडेसहा लाख जॉब कार्ड धारक असूनही निधी प्रलंबित आहे. याबाबत आपण संबंधित अधिकाऱ्यांशी थेट चर्चा करून निर्णय घेऊ, असे आश्वासन डॉ. गोऱ्हे यांनी दिले. सामाजिक वनीकरण, गाव पातळीवर क्रीडांगण व उद्यानांची निर्मिती, महिला स्वच्छतागृहांची आवश्यकता यासारख्या मुद्द्यांवरही त्यांनी सविस्तर चर्चा केली.


*ऊसतोड मजूर व मुकादम नोंदणीचा मुद्दा*


मुकादमांच्या माध्यमातून काम करणाऱ्या मजुरांची अधिकृत नोंदणी करण्यात यावी, असे निर्देश देत, त्यातून ऊसतोड कामगारांचे संरक्षण सुनिश्चित करता येईल, असा विश्वासही डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केला.


*गर्भाशय काढणे (हिस्टरेक्टॉमी) या प्रक्रियेवर नियंत्रण*


हिस्टरेक्टॉमी प्रक्रियेवर कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश देत, ऊसतोड महिला कामगारांमध्ये याचे प्रमाण कमी झाल्याचा उल्लेखही त्यांनी केला.


*सकारात्मक बदलांची अपेक्षा*


"बीड जिल्ह्यात महिलांच्या आणि विशेषतः मुलींच्या सुरक्षेबाबत सकारात्मक गोष्टी ऐकायला मिळाव्यात, अशी माझी अपेक्षा आहे," असे उद्गार विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी काढले.


या बैठकीत दिलेले निर्देश आणि घेतलेल्या आढाव्यामुळे जिल्ह्यातील विविध समस्यांवर ठोस उपाययोजना होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News