पारंपारिक शाहिर लोककला सवर्धन मंडळ सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी शाहीर बाळू सितासावर यांची निवड - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, April 26, 2025

पारंपारिक शाहिर लोककला सवर्धन मंडळ सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी शाहीर बाळू सितासावर यांची निवड

 


सोलापूर : कलावंतांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असलेल्या पारंपारिक शाहीर लोककला संवर्धन मंडळ सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी शाहीर बाळू सीतासावर कंदलगावकर यांची निवड संस्थेचे संस्थापक अध्यक्ष त्रिरत्नकुमार भवरे कामारीकर यांनी केली आहे. या निवडीने त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

       पारंपारिक लोककला संवर्धन  मंडळाचे संस्थापक अध्यक्ष त्रिरत्नकुमार भवरे कामारीकर , गंगाधर सोनकांबळे, गायिका चंदा सूर्यवंशी, मारुती चितोरे, संविधान जमदाडे, अनुष्क जमदाडे यांच्या उपस्थितीत  एका विशेष कार्यक्रमात पारंपारिक शाहीर लोककला संवर्धन मंडळाचे प्रदेश उपाध्यक्ष शाहीर बापूराव जमदाडे यांनी नियुक्ती पत्र शाहीर बाळू सीतासावर यांना प्रदान केले.

        शाहीर सीहासावार यांचे सामाजिक धार्मिक सांस्कृतिक कार्यात मोठे योगदान आहे. त्यादृष्टीने त्यांनी कलावंताच्या एकजुटी करिता प्रयत्न करावे तसेच सोलापूर जिल्ह्यात गाव तिथं पारंपारिक लोककला संवर्धन मंडळाच्या शाखा स्थापन करून कलावंतांचे संघटन मजबूत करावे याकरिता पारंपारिक शाहीर लोककला संवर्धन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष त्रिरत्नकुमार भवरे  यांच्या सूचनेनुसार शाहीर बापूराव जमदाडे यांनी शाहीर बाळू सीतासावर यांची निवड केली आहे. शाहीर बाळू सीतासावर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे कलाकार व मित्रमंडळी कडून कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News