लोहा तालुक्यातील सर्वच मंडळात अतिवृष्टीची नोंद ; नुकसानीचे पंचनामे करणे सुरू - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, August 30, 2025

लोहा तालुक्यातील सर्वच मंडळात अतिवृष्टीची नोंद ; नुकसानीचे पंचनामे करणे सुरू



 नांदेड ता. 30 ऑगस्ट :- लोहा तालुक्यात शुक्रवार 29 ऑगस्ट रोजी सकाळी 3 वा. पासून मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे सर्वच मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. लोहा नगरपरिषद हद्दीतील सिद्धार्थनगर, इंदिरानगर, साईगोल्डन सिटी व कलालपेठ या भागात जवळपास 80 घरांमध्ये पाणी गेले होते. घरातील 35 ते 40 रहिवाशांना स्थानिक नागरीकांच्या मदतीने महसूल, पोलिस व नगरपरिषद प्रशासनाने सुखरुप बाहेर काढले. 



     त्यांची जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तात्पुरत्या निवाराची व्यवस्था केली. तसेच साधारणतः 400 लोकांच्या जेवणाची तात्काळ व्यवस्था केली. तसेच लोहा तालुक्यातील 56 मयत जनावरे, 157 घरपडीचे पंचनामे व शेतपीक नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत, अशी माहिती तहसिलदार लोहा यांनी दिली आहे.



No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News