नांदेड, ता. 29 ऑक्टोबर :- हिंदु खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळ मर्यादित (महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची उपकंपनी ) जिल्हा कार्यालय नांदेड यांच्यामार्फत सन 2025-26 या आर्थिक वर्षातील राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनेंतर्गत कर्ज योजना राबविण्यासाठी योजनानिहाय उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. गरजू लाभार्थ्यांनी कर्ज मागणी अर्ज करण्यासाठी जिल्हा कार्यालयास भेटुन लागणाऱ्या कागदपत्रासह महामंडळाच्या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या. जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.
हिंदू खाटीक समाजाच्या उन्नतीसाठी व आर्थिक विकासाच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने महामंडळाची स्थापना 5 जुन 2025 रोजी केली आहे. याअंतर्गत अनुदान योजना, बीजभांडवल योजना, थेट कर्ज योजना, एनएसएफडीसी कर्ज योजना राबविण्यात येत आहेत. अशा विविध योजना महामंडळाकडुन राबविण्यात येतात. या योजनेचे उदिष्ट मुख्यालय मुंबई यांच्याकडून प्राप्त झाले आहे.
*अनुदान योजना*
या योजनेअंतर्गत 50 हजार रुपयापर्यंत कर्जासाठी अर्ज करता येतील. यात 25 हजार रुपये महामंडळाचे अनुदान व 25 हजार रुपये बँकचे कर्ज दिले जाते.
*बीज भांडवल योजना*
या योजनेअंतर्गत 5 लाख रुपयापर्यंत कर्जासाठी अर्ज करता येतील. यामध्ये महामंडळाचे अनुदानसह 20 टक्के कर्ज व बँकेचा सहभाग 75 टक्के कर्ज व अर्जदाराचा सहभाग 5 टक्के असे एकूण 5 लाख रुपयापर्यंत कर्ज दिले जाते.
*थेट कर्ज योजना*
या योजनेंतर्गत 1 लाख रुपयापर्यंत महामंडळाकडून 50 हजार रुपये अनुदान व 45 हजार रुपये कर्ज व्याज दर द.स 4 टक्के व अर्जदाराचा सहभाग 5 हजार रुपये असे एकुण 1 लाखापर्यंत कर्ज दिले जाते.
*एनएसएफडीसी कर्ज योजना*
याअंतर्गत 5 लाख रुपयापर्यंत त्यामध्ये एन.एस.एफ.डी.सी. महामंडळाकडुन 75 टक्के बीजभांडवल अनुदानासह 20 टक्के व अर्जदाराचा सहभाग 5 टक्के कर्ज दिले जाते.
या योजनेंतर्गत लाभार्थी हा हिंदु खाटीक जातीचा असावा या समाजातील गरजु व्यक्तींना स्वत:चा उदरनिर्वाह व स्वयंरोजगार मिळविण्यासाठी छोटे-मोठे लघुउद्योग जसे किराणा दुकान, जनरल स्टोअर्स, ब्युटी पार्लर, शेळीपालन, दुग्धव्यवसाय, रेडिमेट गारमेंट इत्यादी व्यवसायासाठी महामंडळामार्फत कर्ज व अनुदान दिले जाते.
*प्राप्त उद्दिष्ट*
अनुदान योजना 50 हजार पर्यंत 25 हजार रुपये बँकेचे कर्ज व 25 हजार रुपये अनुदान या योजनेसाठी भौतिक उद्दिष्ट 10 असून आर्थिक उद्दिष्ट अनुदान 5 व बीजभांडवल कर्ज निरंक आहे.
बीज भांडवल योजनेत 50 हजार ते 5 लाखापर्यंत योजनेसाठी भौतिक उद्दिष्ट 10 असून आर्थिक उद्दिष्ट अनुदान 5 व बीजभांडवल कर्ज 4.50 आहे.
थेट कर्ज योजना 1 लाखापर्यंत योजनेसाठी भौतिक उद्दिष्ट 5 असून आर्थिक उद्दिष्ट अनुदान 2.50 व बीजभांडवल कर्ज 2.25 राहील.
एनएसएफडीसी 1 लाख 40 हजार ते 5 लाख रुपयापर्यंत योजनेत भौतिक उद्दिष्ट 12 असून आर्थिक उद्दिष्ट अनुदान व बीजभांडवल कर्ज निरंक याप्रमाणे आहे.




No comments:
Post a Comment