किनवट : राज्य निवडणूक आयोग यांच्याकडुन किनवट नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक-२०२५ टप्पेनिहाय वेळापत्रक प्रसिध्द करण्यात आले असुन त्यानुसार बुधवारी (ता. २६/११/२०२५ ) निवडणूक लढविणाऱ्या वैध उमेदवारांना निवडणूक चिन्ह नेमुन देण्याची तारीख निश्चित करण्यात आलेली आहे.
त्याअनुषंगाने या प्रसिध्दी पत्रकान्वये सर्व निवडणूक लढविणाऱ्या अध्यक्ष व सदस्य पदाच्या उमेदवारांना कळविण्यात येते की, दि.२६/११/२०२५ रोजी सकाळी ११.०० वा. पासुन नगर परिषद कार्यालय, किनवट या ठिकाणी प्रभाग निहाय चिन्ह नेमुन देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी. असे आवाहन तहसिलदार तथा किनवट नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक-२०२५ च्या निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शारदा चौंडेकर यांनी केले आहे.




No comments:
Post a Comment