किनवट : येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील एका आदिवासी विद्यार्थ्याने बारामती येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कराटे स्पर्धेत कांस्य पदक पटकाविल्याने सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती येथे राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा २०२५-२६ चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नांदेड जिल्हयातील किनवट या डोंगरी तालुक्यातील बोधडी (बु) या गावातील मूळनिवासी तथा शासकीय आदिवासी आश्रम शाळा किनवट येथील इयत्ता ६ वीमध्ये शिकणारा आदिवासी विद्यार्थी गजानन मारुती खूपसे याने १४ वर्षे वयोगटाखालील मुलांच्या २० किलोग्रॅम वजनगट राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत कांस्य पदक पटकावले आहे. आदिवासी पारंपरिक खेळा व्यतिरिक्त या विद्यार्थ्याने इतर खेळामध्ये कौशल्य प्राप्त करून यश संपादन केले आहे. यामुळे आता हा विद्यार्थी महाराष्ट्र शासनच्या नौकरी मध्ये ५% आरक्षणाचा भागिदार बनला आहे.
बारामती येथे पुणे येथील जिल्हा क्रीडा अधिकारी पुणे जगन्नाथ लकडे , एशियन पदक विजेते व कराटे असोसिएशनचे महाराष्ट्र सचिव संदीप गाडे यांनी या विद्यार्थ्यास घडविणारे क्रीडा शिक्षक राष्ट्रीय प्रशिक्षक संदीप येशीमोड यांचे उपस्थितीत ह्या विद्यार्थ्यास प्राविण्य प्रमाणपत्र व कास्य पदक प्रदान केले.
या भरीव यशाबद्दल प्रकल्पाधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी जेनित चंद्रा दोन्तुला, गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने, सहायक प्रकल्पाधिकारी (शिक्षण) राजेंद्र शेळके , केंद्र प्रमुख उत्तम कानिंदे , आश्रम शाळेचे मुख्याध्यापक दिलीप मुंडे , सह शिक्षक गणेश येरकाडे , माधव देशमुखे , श्री मडावी , श्री घुले आदीसह सर्व शिक्षकांनी खेळाडूचे अभिनंदन केले आहे.




No comments:
Post a Comment