*भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन* - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, December 7, 2025

*भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन*

 


 

नांदेड  : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 70 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज त्यांच्या पुर्णाकृती पुतळयास समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन केले. यावेळी से.नि.वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक अशोक गोडबोले, समाज भूषण पुरस्कार प्राप्त भगवान ढगे, समाज कल्याण अधिकारी गजानन नरवाडे, समाज कल्याण निरिक्षक संजय कदम, पी. जी. खानसोळे व कार्यालयातील सर्व कर्मचारी आदी उपस्थित होते.

 

त्यानंतर सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयात सकाळी 11 वा. परमपुज्य भदंत पैयाबोधी थेरो नांदेड जिल्हा भिकू महासंघ अध्यक्ष तथा प्रमुख श्रामणेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदुसा, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे व उपस्थितांनी दिपप्रज्वलण करुन महामानवाच्या प्रतिमेस पुष्पअर्पण करुन त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केले.

 


भारतीय संविधान प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करुन भदंत पैया बोधी थेरो व भिक्कु संघ समवेत कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी वृंदानी त्रिशरण पंचशील वंदना घेतली. कार्यक्रमास भिकु महासंघाचे भिकू शील धम्म, भिकू सुयश, भिकू श्रद्धानंद, भिकु सारिपुत, भिकू सुबोधि, भिकु शांतीदूत, भिकू संघसेन, भिकू शाक्यमुनी व सामाजिक कार्यकर्ते सुरेश हटकर,गंगाधर सुर्यवंशी, रवि चिखलीकर,अशोक गोडबोले, संजय कदम, स.क.नि. व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयातील कर्मचारी, विविध महामंडळाचे कर्मचारी, समाजिक कार्यकर्ते या अभिवादन कार्यक्रमास मोठया संख्येने उपस्थित होते. 

 

संविधानिक मूल्य समता, न्याय, बंधुता व एकता प्रत्येकाने दैनंदीन जीवनात जोपासना केल्यास खऱ्या अर्थाने महामानवाच्या कार्यास अभिवादन केल्यासारखे आहे, असे मत समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी प्रास्ताविकात व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजन शिवानंद मिनगीरे यांच्या मार्गदर्शनाखाली संजय कदम, स.क.नि, शशिकांत वाघामारे, इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गजानन पांपटवार यांनी केले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News