किनवट : हरिद्रा संशोधन केंद्राचे अध्यक्ष, गटनेते आ. हेमंत पाटील यांच्या पुढाकाराने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शासनाकडून तातडीने निधी मंजूर करण्याचे आश्वासीत केल्याने तीन वर्षापूर्वी मंजूरी मिळालेल्या गोकुंदा येथील 100 खाटांच्या स्त्री रूग्णालय इमारतीच्या बांधकामाचा मार्ग सुकर झाल्याने सर्वत्र आनंद व्यक्त केल्या जात आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शासन निर्णय क्र. स्थापना/प्र.क्र. 105/आरोग्य-4 ता. 27 सप्टेंबर 2023 अन्वये गोकुंदा ता.किनवट जि. नांदेड येथे 100 खाटांचे स्री रूग्णालय खास बाब म्हणून मंजूर करण्यात आले. त्यानंतर जिल्हा चिकित्सक नांदेड व मुख्य क्षेत्रिय अभियंता नांदेड यांनी रूग्णालय इमारत व अधिकारी, कर्मचारी निवासस्थान बांधकामाकरिता सादर केलेले बावन कोटी ब्याऐंशी लाख सत्तावीस हजार रूपयांच्या अंदाज पत्रकास प्रशासकीय मान्यता मिळणेसाठी उपसंचालक, आरोग्य सेवा, रूग्णालये (राज्यस्तर), मुंबई यांना ता. 27 जानेवारी 2026 रोजी प्रस्ताव सादर केला परंतु निधी अद्याप मंजूर झाला नव्हता.
तेव्हा शिवसेना नांदेड जिल्हा प्रमुख विवेक देशमुख व दिशा समिती मा. सदस्य मारोती सुंकलवाड किनवट यांनी सारखणी येथे महाआरोग्य शिबीरा निमित्त आलेले शिवसेना नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना मंजूर असूनही निधी अभावी स्त्री रूग्णालय कार्यान्वित झाले नसल्याची बाब लक्षात आणून दिली. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन केंद्राचे अध्यक्ष (कॅबीनेट मंत्री दर्जा), गटनेते तथा विधान परीषद सदस्य हेमंत पाटील यांनी पुढाकार घेऊन या बाबीकडे त्यांचे लक्ष वेधले तेव्हा खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गोकुंदा येथील 100 खाटांच्या स्त्री रूग्णालय मुख्य इमारत व अधिकारी, कर्मचारी निवासस्थान बांधकामाकरीता शासन स्तरावर पाठपुरावा करून तातडीने निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासीत केल्याने आता या रूग्णालयाचा मार्ग मोकळा झाला आहे.
आदिवासी, बंजारा बहुल भागातील गरोदर महिलांना स्त्री रूग्णालय व तज्ज्ञ डॉक्टर्स अभावी नांदेड, आदिलाबाद व यवतमाळ येथे रेफर केल्या जात होते. परंतु आ. हेमंत पाटील यांच्या पुढाकाराने जिल्हाप्रमुख विवेक देशमुख व दिशा समिती मा. सदस्य मारोती सुंकलवाड यांनी लक्ष वेधून खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांचे मार्फत निधीसाठी पाठपुरावा केल्याने किनवट तालूका प्रमुख बालाजी मुरकुटे, माहूर तालूका प्रमूख सुदर्शन नाईक, उपजिल्हा प्रमुख गजानन कोल्हे, जिल्हा सचिव मनोज तिरमनवार , महिला आघाडी तालुका अध्यक्षा गंगुबाई परेकार , शहर प्रमुख सूरज सातुरवार आदिसह सर्व सर्कल प्रमुख, उपसर्कल पमुख, शाखा प्रमुख व नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.





No comments:
Post a Comment