*नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी महेश पाटील रुजू* *पहिल्याच दिवशी घेतला खातेप्रमुखांच्या कामकाजाचा आढावा* - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, July 2, 2026

*नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी महेश पाटील रुजू* *पहिल्याच दिवशी घेतला खातेप्रमुखांच्या कामकाजाचा आढावा*




नांदेड, ता. २ जुलै :  नांदेड जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी आज पदभार स्वीकारला. प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे महेश पाटील यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

     महेश पाटील हे यापूर्वी सारथी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते. शासनाने त्यांची नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती केल्यानंतर त्यांनी आज जिल्हा परिषद कार्यालयात पदभार स्वीकारला.

     पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेतील सर्व  खातेप्रमुखांची बैठक घेऊन विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. शासनाच्या लोकाभिमुख योजना प्रभावीपणे राबविणे, विकासकामांना गती देणे, तसेच नागरिकांना दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी दिल्या. तसेच शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.


     यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश देशमुख, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाचे उपआयुक्त डॉ. डी. बी. खुणे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. प्रवीणकुमार घुले, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी (प्रा) वंदना फुटाणे, समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक मयूरकुमार आंदेलवाड, जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ. नीलकुमार ऐतवडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, कार्यकारी अभियंते खराडे, संजय शिंदे व बालाजी पवार, व्यंकटराव चव्हाण, दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी अवधूत गंजेवार, नियोजन विभागाचे शिक्षणाधिकारी दिलीपकुमार बनसोडे यांच्यासह जिल्हा परिषदेचे सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.



No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News