किनवट : तालुक्यातील पांधरा येथील आरोपीने पत्नीस काठीने मारहाण करून गंभीर दुखापत केल्या प्रकरणी दाखल गुन्ह्याचा योग्य तपास करून भक्कम पुरावे सादर केल्याने येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी आरोपीस एक वर्षे सश्रम कारावास व 5000/- द्रव्यदंड अशी शिक्षा सुनावली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की , कौंटूबिक वादातून आरोपी नामे मारोती मोहनाजी टारपे रा. पांधरा ता. किनवट याने स्वतःचे पत्नीस काठीने मारहाण करून गंभीर दुखापत केले अशी फिर्यादी शाकुंतला मारोती टारपे, रा पाधरा ता किनवट यांनी पोलीस स्टेशन किनवट येथे दिनांक 13.01.2026 रोजी सादर केल्याने गु.र.नं. 07/2026 कलम 118 (2),118 (1), 115 (1), 352,351 (2) भारतीय न्याय संहिता 2023 कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा तपास पोहेकॉ / श्री पुरी, पो स्टे किनवट यांनी करून भक्कम पुरावे गोळा करून मा. न्यायालयात आरोपी विरूध्द दोषारोप सादर केले. सदर प्रकरणात श्री पी.एम.माने, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी सरकार पक्षाच्या वतीने पुरावे ग्राह्य धरून आरोपी नामे मारोती मोहनाजी टारपे रा. पांधरा किनवट यास कलम 118 (1), 115 (2) भारतीय न्याय संहिता 2023 कायदा अंतर्गत दोषी ठरवून प्रत्येक कलमान्वये एक वर्षे सश्रम कारावास व 5000/- द्रव्यदंड अशी शिक्षा सुनावली आहे.
नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, यांचे मार्गदर्शनाखाली मा. न्यायालयात चालू असलेल्या खटल्यांमध्ये विशेष लक्ष देण्यासाठी Trial Monitoring Cell ची स्थापना करण्यात आली आहे. या प्रकरणातील यशस्वी तपासामुळे आरोपीस शिक्षा होण्यास मदत झाली असून, महिला विरूध्द होणारे अत्याचारांच्या प्रकरणामध्ये नांदेड पोलीस तत्परतेने व निष्पक्षपणे कारवाई करतील असा संदेश या निकालातून आधोरेखित झाला आहे.
प्रस्तुत प्रकरणात सरकारी अभियोक्ता डि.ऐ. झाडे यांनी सरकार पक्षाच्या वतीने बाजु मांडली. संपुर्ण खटल्याचे दरम्यान कोर्ट पैरवी अधिकारी पोहेकॉ / श्री वागतकर यांनी कामकाज पाहीले.
सदर प्रकरणी पोलीस अधीक्षक श्री नीलाभ रोहन यांनी पोस्टे किनवटचे प्रभारी अधिकारी, तपासीक अधिकारी व कोर्ट पैरवी अधिकारी यांचे अभिनंदन केले आहे.




No comments:
Post a Comment