आता नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व शासकीय व खाजगी शैक्षणिक संस्था बंद ठेवणेबाबत जिल्हाधिकारी यांचे आदेश - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, March 16, 2020

आता नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व शासकीय व खाजगी शैक्षणिक संस्था बंद ठेवणेबाबत जिल्हाधिकारी यांचे आदेश



किनवट :
कोवीड विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंध कायदा १८९७ अन्वये नांदेड जिल्ह्यातील महानगरपालिका व सर्व नगरपालिका , सर्व नगरपंचायत क्षेत्रातील व शहरी हद्दी लगतच्या सर्व सरकारी व खाजगी शाळा तसेच महाविद्यालये व व्यवसाय व प्रशिक्षण केंद्रे तसेच यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश यापूर्वीच दिले होते आता ग्रामीण भागातील सुध्दा सर्वच शाळा व महाविद्यालये दि. ३१ मार्च २०२०पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ . विपीन ईटनकर यांनी दिले आहेत . 
           नांदेड जिल्ह्यातील महानगरपालिका व सर्व नगरपालिका , सर्व नगरपंचायत क्षेत्रातील व शहरी हद्दी लगतच्या सर्व सरकारी व खाजगी शाळा तसेच महाविद्यालये व व्यवसाय व प्रशिक्षण केंद्रे तसेच , यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था , साथरोग प्रतिबंध कायदा १८९७ अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसुचना व नियमावली मधील तरतुदीनुसार दिनांक ३१ मार्च , २०२० पर्यंत बंद ठेवण्याबाबत निर्देश दिले होते.
             तथापि बऱ्याच प्रमाणात शैक्षणिक संस्था ह्या ग्रामीण क्षेत्रात आहेत तसेच , सदर शैक्षणिक संस्थांमध्ये निवासी विद्यार्थी वसतीगृहेही आहेत . त्याच बरोबर या शैक्षणिक संस्थामध्ये दैनंदिन स्वरुपात शहरी व ग्रामीण भागातुन विद्यार्थी येत जात असल्याने या ठिकाणी कोविड विषाणूचा प्रार्दुभाव होण्याची दाट शक्यता असल्याने अशा ग्रामीण क्षेत्रात असलेल्या शैक्षणिक संस्था दि . ३१ मार्च , २०२० पर्यंत बंद ठेवणे आवश्यक आहे . त्यानुसार नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रातील सर्व शासकीय व खाजगी शैक्षणिक संस्था देखील दि . ३१ मार्च , २०२० पर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश नांदेडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ . विपीन ईटनकर यांनी दिले आहेत .
             तसेच ज्या ठिकाणी इयत्ता १० वी व १२ वी च्या परिक्षा तसेच विद्यापीठाची प्रात्यक्षिके व परीक्षा विहीत वेळापत्रकानुसार घेण्यात याव्यात असेही निर्देश दिले आहेत.
             त्याच प्रमाणे आजारी विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणार नाही यासाठी आवश्यक ती दक्षता व खबरदारी घेण्याच्या सुचना देखील दिल्या आहेत .
            मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद , नांदेड, कुलसचिव , स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ , नांदेड, प्रकल्प अधिकारी , एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प , किनवट, सहसंचालक , उच्च शिक्षण अनुदान , नांदेड, प्राचार्य / संचालक , सर्व शासकीय , अनुदानित , विनाअनुदानित , पदवी , पदवित्तर संस्था ( मार्फत सहसंचालक , उच्च शिक्षण अनुदान , नांदेड ), प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था शासकीय / निमशासकीय जि . नांदेड आणि शिक्षणाधिकारी ( माध्यमिक / प्राथमिक ) , जिल्हा परिषद,नांदेड यांना सोमवारी दि. १६ रोजी  जिल्हादंडाधिकारी डॉ . विपीन ईटनकर यांनी आदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.सदर कामाच्या अंमलबजावणीत अधिकारी / कर्मचारी यांचेकडून हलगर्जीपणा निदर्शनास आल्यास संबंधितांविरुध्द कार्यवाही करुन / कार्यवाहीचा प्रस्ताव या कार्यालयास सादर करावा . असेही आदेशात नमूद केले आहे.










No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News