माहूर :
येथे प्रथमच आयोजित केलेला " मराठवाडा -विदर्भस्तरीय बौद्ध उपवर वधू-वर परिचय मेळावा " मोठ्या संख्येनं उपस्थिती दर्शवून भरभरून मिळालेल्या प्रतिसादाने उत्साहात संपन्न झाला.
भारतीय बौध्द महासभा, किनवट तालुकाध्यक्ष अभियंता प्रशात ठमके कार्यक्रमाच्या अध्यक्ष व प्राचार्य मोहन मोरे हे उद्घाटक होते.
यावेळी उमरखेडचे माजी आमदार विजय खडसे , माहूरच्या नगर अध्यक्षा शितल जाधव, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नांदेड जिल्हाध्यक्ष विनोद भरणे, विक्रमी सामुहिक विवाह मेळावा आयोजक प्रकाश गायकवाड, निवृत्त शिक्षक गोकूळदास वंजारे , माजी नायब तहसीलदार पुंडलिकराव भगत , मनोज कीर्तने, डॉ. विठ्ठलराव खडसे, सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र कांबळे, राजेंद्र शेळके, इतिहासकार प्रज्ञानंद हनवते, विनोद भगत,भाग्यवान भवरे, विजय भगत, पत्रकार जयकुमार अडकिणे व पद्मा गिऱ्हे हे प्रमुख अतिथी उपस्थित होते.
वामनदादा कर्डक संगीत अकादमीचे प्राचार्य सुरेश पाटील यांनी बुध्दवंदना घेतली. त्यानंतर उपवर वधू- उपवर वर यांनी आपापला परिचय करून देण्यास प्रारंभ झाला आणि मेळाव्यास सुरवात झाली. एस एस पाटील यांनी सूत्रसंचालन केले. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी संयोजक राहूल भगत, सिद्धार्थ तामगाडगे आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच माहूरच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment