समाज प्रदुषण..!
---प्रा.नंदू वानखडे,मुंगळा जि.वाशिम- 9423650468
काल त्याचा समर्थक होतो
आज याचा झालो...
काल सांगत होतो स्वाभिमान आपुला
आज समाज विकण्यास कामी आलो...!!
काल पर्यंत बाळगली
आम्ही त्यांच्यासाठी निष्ठा...
आज अचानक स्वार्थापायी
वाढून घेतली विष्ठा...!
बाबासाहेब सांगाय आमच्याजवळ
ऊरलं तरी काय...?
आम्हीच मोडले चळवळीचे
स्वार्थासाठी पाय....!
तरी निर्लज्ज होऊन
मिरवणूकीत आम्हीच सर्वांच्या पुढे...
आपलीच माणसं पाडण्यासाठी
आपलेच संघर्ष लढे...!
कोण म्हणते शत्रू आमचा
बाहेरचा आहे कुणी...?
आपणच आपल्यात दररोजची
काय कमी देत गेलो धुणी...!"
कालचा जयभीम ओठावरचा
थुका बदलावा जसा बोटावरचा...
पिळ बेंबीच्या देठावरचा....
विकला गेला कालचा गद्दार
भिमगिरीच्या बेटावरचा....!
काय समाजा भुषण त्याचे..?
करा ऊजागर दुषण त्याचे...
समाजापासून दूर करावे
सर्व मिळोनी प्रदूषण त्याचे...!'
---प्रा.नंदू वानखडे ,मुंगळा जि.वाशिम--9423650468 .
No comments:
Post a Comment