कामगाराच्या श्रम जाणिवेची ही एक कविता..!
(घामाच्या चिंबधारा अंगभर वाहणा-या साठी आणि श्रमदानाची सेल्फी काढून पाहणा-यासाठी..)
कामगार दिनाची कविता..!
---प्रा.नंदू वानखडे ,मुंगळा जि.वाशिम- -9423650468
चला गड्यांनो ! फोटोपुरते काम करू या...
एकच टोपलं भरून, श्रमदान करू या...!
एक मे ,कामगार दिनाच्या औचित्यावर...
खोदून टाकू काना- कोपरा, एखादे वावर...
ऊगाच दस्तीत टपकणारा घाम धरू या....
एकच टोपलं भरून ,श्रमदान करू या...!
प्रशंसकाचे येतील फोन ही प्रामुख्याने...
देऊ कबूली करून टाकले ,मुक्या मुक्याने...
आहो आभारी म्हणोनी त्यासी प्रणाम करू या...
एकच टोपलं भरूनी ,श्रमदान करू या..!"
रोज घामाच्या चिंब धारा ज्या वाहील्या ज्याने....
या मातीला दिली ऊभारी ज्या कामगाराने....
त्या हाताचा आज दिवसा सन्मान करू या...!'
ख-या अर्थाने हे ही तितुकेच दान करू या...
तया बोलवा सन्मानाने, गौरव करू या..
गुप्तदान मिठाई देऊन तयाचीओटी भरू या..
आनंदाला आणूनी भरती धुमधाम करू या..
कामगारासाठी हे ही अनोखे काम करू या...!
श्रमिकांच्या श्रमाचे मोल ,खरं ते ठरले का रे...?
सुख समृद्धीने घरं तयांचे खरं भरले का रे...?
जाणिव करूनी जीवात त्यांच्या प्राण भरू या...
या मित्रांनो ,जाणिवेचे हे काम करू या..
त्यांच्यासाठी असे ही एक श्रमदान करू या...!!
No comments:
Post a Comment