शिक्षक बंधु / भगिनिंनो अतिसावधानता बाळगा व स्वतःसह कुटुंबियांची काळजी घ्या.
-बालासाहेब लोणे, इब्टा, केंद्रिय नांदेड जिल्हाध्यक्ष यांचे आवाहन
नांदेड :
आताच स्मृतिशेष राजेंद्र बोडके व महेंद्र वाघमारे या दोघांच्या अंत्यविधीला जावून आलोय. दोघांचेही आकस्मात निधन झालेले असल्यामुळे दोघांचेही कुटुंबिय प्रचंड दुःखी, शोकाकूल व प्रचंड तणावाखाली. दोघांच्याहीप्रती आदरांजली व त्यांच्या कुटुंबियांप्रती ह्रदयपूर्वक सद्भावना. आकस्मात वा अपघाती निधनानंतर शोकाकूल पती,पत्नी, मुले, नातेवाईकांचा होणारा प्रचंड दुःखावेग हृदयाला व मनाला प्रचंड चिरुन जातो.
नांदेड जिल्हयात उन्हाचा पारा प्रचंड वाढलेला आहे,नांदेड जिल्ह्याचे तापमान 45 अंश सेल्सिअससपर्यंत पोहंचलेले आहे. उन्हापासुन संरक्षण करण्यासाठी पुरेशी काळजी न घेतल्यामुळे, थोडासा हलगर्जीपणा, बेफिकीरपणा व निष्काळजीपणामुळे आज राजेंद्र बोडखे या तरुण व इंग्रजीत निष्णांत असणाऱ्या शिक्षकांचा उष्माघाताने मृत्यू झाला व त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा सर्वात मोठा डोंगर कोसळला. कुटुंबियांचा आधारवड गेला.पत्नी व मुले प्रचंड आक्रोश करत होती. मुलीची ता.5 मे रोजी NEET ची परिक्षा आहे. इतक्या दुःखात पत्नी व मुले कसे सावरतील हा आता मोठा प्रश्न आहे. मुलांच्या उज्ज्वल भविष्य आकस्मात अंधारात ढकलले गेलेले आहे.
तेंव्हा आपणांस विनंती की, स्वत:ची या तप्त उन्हात व इतर बाबीत पुरेशी काळजी घ्या कारण आपण आपल्या ज्या कुटुंबियांना जिवापाड जपतो त्याच कुटुंबियांना आपल्या बेफिकीरपणा निष्काळजीपणाचे अतिशय वाईट दूरगामी परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात. हे स्मरणात ठेवावे. कर्तव्य व कामे पार पाडवी लागतातच परंतू बाहेर पाडताना पुरेशी काळजी आवश्य घ्या. कारण ♦समय मूल्यवान है, पर जीवन अमूल्य है I ♦आपण अनेक गोष्टी वाचून सोडून देतो आजच्या विविध दैनिकात पहिल्या पानावर बीडमध्ये उष्माघाताचे दोन बळी त्यात एक जिप शिक्षक चंद्रकांत मारोती हिरवेचा व मजुर परमेश्वर वाघचा बळी अशी मोठी बातमी आहे. आठ पंधरा दिवसापुर्वी बिलोलीतूनही एका शिक्षिकेचा उष्माघाताने मृत्यू अशी बातमी वाचून आपण सोडून दिली. मागच्या पंधरवडयात तृप्ती तेहरा ह्यांचा किनवट रेल्वेस्टेशनवर उतरताना अपघाती मृत्यू झाला. हेही आपण स्मरणात ठेवावे. आपण स्वतःसाठी व कुटुंबियांसाठी अत्यंत अनमोल आहात व तुमच्यावर तुमचे कुटुंबिय अवलंबून आहेत. कामधंदे सोडून घरी तर बसता येणार नाही परंतू कोणतेही काम करताना वा या तप्त उन्हात बाहेर पडताना पुरेशी काळजी घेणे मात्र आपल्या हातात आहे व कंजुषी न करता (आता सातवा वेतन आयोगही लागलाय) त्यामुळे स्वतःसाठी वारंवार थंड बिसलरी बॉटल खरेदी करुन सतत पाणी पित रहा व शरीराचे तापमान एप्रिल- मे- जूनपर्यंत संतुलित ठेवा. असे आवाहन इंडियन बहुजन टीचर्स असोसिएशन ( इब्टा) म.राज्य शिक्षक व कर्मचारी संघटना केंदीय नांदेड जिल्हाध्यक्ष , नांदेड जिल्हा परिषद अधिकारी/कर्मचारी जयंती मंडळ सचिव तथा सहकारी पतपेढी शिक्षण विभाग म.जिल्हा परिषद, नांदेडचे माची सचिव बालासाहेब लोणे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment