अत्याचार प्रकरणी युवकावर गुन्हा दाखल
किनवट :
लग्नाचे आमिष दाखवून सतत दोन वर्षे जबरीने शारीरिक संबंध केल्याप्रकरणी एका १७ वर्षीय मुलीने दिलेल्या तक्रारीवरून किनवट पोलिसात अजय रईन पवार रा. सिंदगी बोधडी (बुद्रूर्क ) याच्यावर किनवट पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याबाबत सविस्तर वृत्त असे की ता. २६ एप्रिल रोजी मौजे सिंदगी येथील १७ वर्षीय मुलीने किनवट पोलिसात दिलेल्या तक्रारीत असे नमूद आहे की ,माझ्या घराशेजारी असलेला अजय रईन पवार यांच्याशी चांगली ओळख होती. त्या ओळखीचे आरोपीने मैत्रीमध्ये रूपांतर करून मला लग्नाचे आमिष दाखवत जवळपास दोन वर्ष माझ्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले . तसेच मला ता. २० एप्रिल रोजी घरातून पळून जाऊ असे सांगितले आणि मी त्याच्यासोबत आदिलाबाद गाडीने पळून गेले .आम्ही दोन-तीन दिवस सिकंदराबाद येथे अजयच्या मित्राकडे रूम करून राहिलो अजयला काम न मिळाल्यामुळे आम्ही ता. २४ एप्रिल रोजी गावाकडे परत आलो .त्याने मला स्वतःच्या घरी न नेता मला माझ्या घरी सोडून निघून गेला मग परत आला नाही .मी घडलेला सर्व प्रकार आई-वडिलांना सांगितला माझ्यावर लग्नाचे आमिष दाखवून सतत दोन वर्षे माझ्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्या प्रकरणे संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी तक्रार पीडिताने दिल्यावरून पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप तिडके यांनी मुख्य आरोपी अजय रईन पवार याचेवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास फौजदार चव्हाण हे करत आहेत .
No comments:
Post a Comment