बुध्द पोर्णिमेला चौका (औरंगाबाद ) येथे ५०
फूट उंच सम्यक सम्बुध्दांच्या रूपाची प्रतिष्ठापना
औरंगाबाद :
लोकुत्तरा चॅरिटेबल मिशन चौका, अजिंठा रोड औरंगाबाद यांचे वतीने चौका-औरंगाबाद येथील लोकुत्तरा आंतरराष्ट्रीय भिक्कू प्रशिक्षण केंद्र येथे येत्या बुद्ध पौर्णिमेला शनिवारी (ता. १८ मे र०१९ ) सायंकाळी ४ वाजता बुद्धाब्द २५६३ या बौद्ध वर्षाच्या प्रथम दिनी लोकुत्तरा महाविहाराच्या परिवेणेत ५० फूट उंच सम्यक सम्बुद्धांच्या रूपाचा भव्य लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी मार्गदर्शक म्हणून पुज्य भदंत बोधीपालोजी महाथेरो , प्रमुख अतिथी म्हणून तिबेट सेंट्रल एडमिनिस्ट्रेशन धर्मशालाचे राष्ट्राध्यक्ष डॉ. लॉबसांग सांम्वे आणि देश-विदेशातील वंदनिय भिक्खू संघाची उपस्थिति राहणार आहे.
हे नव्याने उभारण्यात येत असलेले बुद्ध रूप धवल रंगात असून यामुळे महाविहाराच्या व आंतरराष्ट्रीय भिक्खू प्रशिक्षण केन्द्राच्याच नव्हे तर औरंगाबादच्याही वैभवात भर पडणार आहे. रात्रिचे वेळी त्यावर लेसर किरणोत्सव सुरू झाल्या वर येथील नजारा पाहण्या सारखा असणार आहे.
सहल म्हणून आपल्याला येथे कधीही जाता येईल,पण भिक्खू संघाने आयोजित केलेला हा सोहळा पाहणे ही एक पर्वणी असणार असून या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्याची सुवर्ण संधी मात्र परत येणार नाही म्हणून आपण शुभ्र वस्त्र परिधान करून मित्र-परिवार, नातेवाईक यांना घेवून या सोहळ्याचे साक्षीदार व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment