दागिण्यांसह सव्वा लाखाची पर्स परत करून एसटी कर्मचाऱ्यांनी दाखविला प्रामाणिकपणा - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, May 11, 2019

दागिण्यांसह सव्वा लाखाची पर्स परत करून एसटी कर्मचाऱ्यांनी दाखविला प्रामाणिकपणा

दागिण्यांसह सव्वा लाखाची पर्स परत करून एसटी कर्मचाऱ्यांनी दाखविला प्रामाणिकपणा


किनवट :
दागिण्यांसह सव्वा लाख रुपये असलेली लेडीज पर्स प्रवाशी महिलेस परत करून किनवट आगारातील चालक -वाहकांनी प्रामाणिकपणा अजूनही शाबूत असल्याची प्रचिती दाखविल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे
                किनवट येथील  चालक श्रीधर जिल्लेवाड (क्र. २२४२१ )  व वाहक रमेश शेपुरवार क्र. ( १३३८ ) हे औरंगाबाद वरून  किनवट येणारी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस घेऊन किनवटला पोहचले. सर्व प्रवाशी उतरून गेले. बस आगारात लावणार तेव्हा बसमध्ये एक लेडीज पर्स दिसली. त्यात सोन्या -चांदीचे दागिणे, रोख रक्कम 1 लाख दहा हजार  रुपये व मोबाईल होता. ती पर्स त्यांनी आगारात जमा  केली. मोबाईलवरून संपर्क साधला असता. ललिता उमेश चव्हाण  राहणार मांडवी ह्यांनी सारखणी ते राजगड  प्रवासादरम्यान ती पर्स बसमध्येच विसरली होती. त्या आगारात आल्यानंतर  त्यांची ओळख पटवुन कायदेशीर पद्धतीने व आदराने त्यांना ती पर्स परत केली. यावेळी सटलावार, लिपीक डवरे, सुरक्षा रक्षक उमरीकर, चालक व वाहक उपस्थित होते. विवाह कार्यासाठी दागिणे व रक्कम घेऊन जात होते. एसटीच्या या  दोन्ही कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणा दाखविल्याबद्दल त्यांचे व आगार व्यवस्थापनाचे त्या महिलेने आभार मानले. या प्रामाणिकतेबद्दल सर्व आगार कर्मचारी व  प्रवाशांनी चालक व वाहक कर्मचाऱ्याचे कौतुक केले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News