किनवट ( प्रशांत वाठोरे ) :
महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे तर्फे नोव्हें-डिसे २०१८ मध्ये एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती परीक्षा आणि फेब्रुवारी २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृती परिक्षेत गोकुंदा येथील महात्मा ज्योतीबा फुले विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.एन.एम.एम.एस परीक्षेत चार तर पूर्व उच्च प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृती परीक्षेत वीस विद्यार्थी शिष्यवृतीस पात्र ठरले आहेत.या दोन्ही परीक्षा मध्ये ८वी ची विध्यार्थीनी कु.ऋतुजा प्रशांत वाठोरे हिने पात्र ठरत घवघवीत यश मिळवले आहे. या बद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी घेण्यात येणाऱ्या एन.एम.एम.एस परीक्षेत १२ हजार वार्षिक शिष्यवृत्ती याप्रमाणे चार वर्ष अशी ४८ हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे.पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परिक्षा (पी.यु.पी.) इयत्ता पाचवी मधिल एकूण सहा विद्यार्थी पात्र आहेत. ऋग्वेद अर्जून फड, दिशांत माधव मुंडकर, कु.समृद्धी सुभाष उन्हाळे, संदीप संजय मरडे, कु.स्नेहल राजेंद्र चव्हाण, कु.प्रीती जनार्धन दुधमल. पूर्व माध्यमिक शिष्यवृती परिक्षा (पी.एस.एस.) इयत्ता आठवीतील कु.ऋतुजा प्रशांत वाठोरे,कु.श्रावणी मनोज भोयर, संजय नरेंद्र कानिंदे, कु.मधुरा संतोषसींह बैस ठाकूर,ओंकार किशोर डांगे, प्रथमेश वसंत मडावी, अथर्व विनोद पिसलवार, वैष्णवी अंतेश्वर होनराव, वेदांत माधव मुंडकर, सुरज सुरेश मुनेश्वर, शितल गोविंद खतगाये, अजिंक्य शिवकांत राठोड, नागेश शामसुंदर पोपुलवाड, यशवंती सुरेश राठोड हे पात्र ठरले आहेत.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्धल संस्थेचे सचिव अभियंता प्रशांत ठमके, कोषाध्यक्ष प्राचार्या शुभांगी ठमके, प्राचार्य आर.जी.वाघमारे, उपमुख्याध्यापक जुम्माखान पठाण, पर्यवेक्षक शेख हैदर, डॉ.महेंद्र नरवाडे, किशोर डांगे, मार्गदर्शक शिक्षक विजय पवार, भाग्यवान खोब्रागडे, सुरेंद्र पाटील, संजय इंगळे यांच्यासह इयत्ता पाचवी व आठवीच्या वर्ग शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
No comments:
Post a Comment