अॅटोची धडक मारली तरी वनकर्मचाऱ्यांनी केला ५१ हजाराचा अवैध मुद्देमाल जप्त - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, May 27, 2019

अॅटोची धडक मारली तरी वनकर्मचाऱ्यांनी केला ५१ हजाराचा अवैध मुद्देमाल जप्त



गोकुंदा ( किनवट ) :
किनवट तालुक्यातील गोकंदा येथे शनिवारी (ता. २५ ) रात्री ९:00 वाजता गुप्त माहीती मिळाल्यावरून  सहायक वनसंरक्षक डाॅ. राजेंद्र नाळे  यांच्या मार्गदर्शनाखाली चिखली ( कोठारी ) गावातुन येणारे अवैद्य सागी लाकूड वाहतूक करणारा अॅटो पकडण्याचा प्रयत्न  करणारे वनरक्षक क-हाळे,चुकलवार यांना ऑटोची धडक देऊन तस्कर फरार झाले. आपली दुचाकी आडवी पडली तरी वनकर्मचाऱ्यांनी अवैध सागवान कट साईज भरलेला अॅटो ताब्यात घेतला. त्यात सागवान कटसाईज नग ७७ घ.मी.०.३४९२ घनमीटर अवैध सागवान कटसाईज ७७ नग आढळले. ज्याची किंमत रुपये २१७५१ आहे. यासह रूपये तीस हजार किमतीचा विना नंबरचा ऑटो असा एकूण ५१ हजार ७५१ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.  सदर कार्यवाहीत किनवट वनविभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी खंदारे, फिरत्या पथकाचे वनपरिक्षेत्राधिकारी शेळके , वनपाल संतवाले , गायकवाड , सांगळे , वनरक्षक घोरबांड, ठवरे, दांडेगावकर, वाहन चालक आवळे, भुतनर, वनमजूर मानसिंग, तामगाडगे, राठोड यांनी मोलाची कामगिरी केली.



No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News