मुंबई ( विनायक भगत ) :
होय, आपण पूर्ण ताकदीने लढलो आणि जिंकलो सुद्धा ! वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमने औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची जागा जिंकली ! औरंगाबादकरांचे मी आभार मानतो आणि इम्तियाज जलील यांचे अभिनंदन करतो.
अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रातील सर्व जनतेचे आभार मानले.
पुढे बोलतांना ते म्हणाले, मात्र, हा लढा लोकसभेच्या जागा जिंकण्यासाठी मर्यादित नव्हता, तर वंचित बहुजन समाजाचे प्रश्न दुर्लक्षित करणाऱ्या, त्यांचे राजकीय अस्तित्व उभ राहू न देणाऱ्या प्रस्थापित राजकीय पक्षांविरोधात होता. आपला हा लढा सर्वार्थाने ऐतिहासिक आहे. कारण, या निवडणुकीमुळे सर्व बहुजन समाज राजकीय अस्तित्वासाठी एकत्र आला. अनेक मतदारसंघात आपल्या उमेदवाराने लाखांच्यावर मतं घेतली आहेत. तसेच वंचित बहुजन आघाडीला या निवडणुकीत प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळू शकली नाही. काही मतांच्या फरकामुळे ही संधी निसटली. प्रस्थापित राजकीय पक्षांकडून शेकडो कोटी रुपये खर्च करून उभी केली जाणारी यंत्रणा, तर दुसरीकडे स्व:खर्चातून बहुजन समाजाने ही निवडणूक लढवली. ही जनतेची निवडणूक होती ! हीच आपली मोठी ताकद आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत ह्याच एकजुटीने आपण निवडणूक लढूयात. वंचित समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी वंचित समाजाला सत्तेत बसवूया.! असा आशावादही अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केला .
No comments:
Post a Comment