विज्ञान व तंत्रज्ञान आणि संस्कृत या दोन विषयात १०० पैकी १०० गुण
नांदेड :
ऑक्सफर्ड ग्लोबल इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी उत्कर्षा अशोककुमार दवणे हिने दहावी परिक्षेत ९६. ८० % गुण घेऊन दैदिप्यमान यश संपादन केले आहे. तिने विज्ञान व तंत्रज्ञान आणि संस्कृत या दोन विषयात १०० पैकी १०० गुण घेतले आहेत. भिमाई चित्रपटाचे निर्माते व पटकथा लेखक , प्रख्यात कवी, नाटककार तथा शब्ददान प्रकाशनाचे प्रकाशक प्रा. अशोककुमार दवणे व वैजयंतीमाला दवणे यांची कन्या असलेल्या उत्कर्षाला उत्तम प्रशासक बनून समाजसेवा करायची आहे. प्रतिकुल परिस्थितीवर मात करून शून्यातून आपलं वेगळं विश्व निर्माण करणाऱ्या दवणे दाम्पत्याच्या उत्कर्षाने संपूर्ण मराठवाड्यातून मागासवर्गीयातून घवघवीत यश संपादन केल्याबद्दल सर्वत्र तिचे कौतुक केले जात आहे.
" आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने... या उक्तीप्रमाणे घरीच पुस्तकालय असल्याने वाचनाची आवड निर्माण झाली. त्यामुळेच सतत ७ ते ८ तास नियमीत अभ्यास करत होते. यात सातत्य ठेवल्यानेच मला हे यश मिळालं. भविष्यात इंजिनिअरींग करून आय.ए.एस.व्हायचं आहे. उत्तम प्रशासक बनून उपेक्षित , वंचित घटकांची सेवा करायची आहे.
-उत्कर्षा दवणे
No comments:
Post a Comment