गोकुंदा, ता. किनवट ( शब्दांजली कानिंदे ) :
एम.एच. सीईटी परिक्षेत मागास प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक पटकावून नीट व जेईई असे दैदिप्यमान तिहेरी यश संपादन करून आदर्श मुकींदा अभंगे या महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याने आदिवासी, डोंगरी किनवट तालुक्यातील विद्यार्थ्यांसमोर नवा आदर्श उभा केला आहे. असे प्रतिपादन मिलिंद शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अभियंता प्रशांत ठमके यांनी केले.
येथील महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालयाच्या मानव विकास कार्यक्रमांतर्गत असलेल्या अभ्यासिकेत आयोजित सीईटी व नीट मध्ये यश मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करतांना ते बोलत होते.
पुढे बोलतांना अभियंता ठमके म्हणाले हे दैदिप्यमान यश किनवटच्या इतिहासात संस्थेला प्रथमच मिळाले असून ही बाब अभिमानाची व गौरवाची आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्येच्या कोषाध्यक्षा प्राचार्या शुभांगी ठमके, मुकुंद अभंगे, सौ. अभंगे, प्राचार्य राजाराम वाघमारे, पत्रकार साजिद बडगुजर, अशीष देशपांडे व उत्तम कानिंदे उपस्थित होते .
याप्रसंगी इयत्ता १२वी तील अादर्श मुकुंद अभंगे यांनी एमएचसीईटीमध्ये मागास प्रवर्गात राज्यात प्रथम, नीट मध्ये ६३६ गुण,JEE मध्ये ९९.४७ टक्के गुण मिळवून दैदिप्यमान यश संपादन केले तसेच नीट मध्ये अभिजीत बाबु मुंडकर (५३० गुण), सिध्दांत सखाराम वाठोरे (५१३ गुण), व साक्षी उल्हास चव्हाण (४१८ गुण ) यांनी यश संपादन केल्याबद्दल त्यांचा व पालकांचा संस्था व कॉलेज तर्फे सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्राचार्य राजाराम वाघमारे व सुत्रसंचालन पर्यवेक्षक शेख हैदर यांनी केले. उपप्राचार्य सुभाष राउत यांनी अभार मानले. यावेळी पालक मुकींदा अभंगे, उत्तम कानिंदे यांच्या सह गुणवंत विद्यार्थी अादर्श, अभिजीत, सिद्धांत यांनीही मनोगत व्यक्त केले. . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक संतोषसिंह बैसठाकुर, प्रा.रघुनाथ इंगळे ,महेंद्र नरवाडे, किशोर डांगे, अंबादास जुनगुरे यांनी पुढाकार घेतला.
" दोन वर्ष हातात मोबाईल घेतला नाही त्यामुळे सोशियल मिडीयात वेळ वेस्ट गेला नाही. दररोज ६ ते ८ तास अभ्यास करायचा. मला आयआयटी मध्ये प्रवेश घेऊन कंम्प्यूटर सॉफ्टवेअरमध्ये संशोधन करायचं आहे.
-आदर्श मुकींदा अभंगे, ( एमएचटी सीईटी, राज्यात प्रथम ( राखीव प्रवर्ग )
" दररोज ७ तास सतत स्वतःला अभ्यासात गुंतून घेतले . गृहपाठ, असाईनमेंट, सराव जास्तीत केला. या कालावधीत स्वतःला फक्त फक्त ज्ञानार्जनात बिझी ठेवले. त्यामुळेच यश मिळालं.
-सिद्धांत सखाराम वाठोरे ( नीट, गुणवंत )
No comments:
Post a Comment