नांदेड :
महात्मा गांधींच्या 150 व्या जयंती निमित्त स्वच्छ भारत दिवस साजरा केला जात असून या निमित्त दिनांक 2 ऑक्टोबर रोजी गुरजरात राज्यातील साबरमती येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी नांदेड जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) कक्षाच्या वतीने जिल्हा कक्षातील सल्लागार, ग्रामसेवक, शिक्षक व स्वच्छाग्रही असे एकूण 32 जण रविवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी साबरमतीला रवाना झाले . यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, ग्राम पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.आर.कोडेंकर, नरेगाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.आर. पाटील, पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डी.यू. इंगोले, जिल्हा पाणी व स्वछता मिशन कक्षाचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक मिलिंद व्यवहारे यांनी साबरमतीला जाणा-या सर्व अधिकारी व कर्मचा-यांना शुभेच्छा दिल्या. जिल्हा कक्षाचे क्षमता बांधणी सल्लागार चैतन्य तांदुळवाडीकर व संनियत्रण व मुल्याकंन सल्लागार कृष्णा गोपीवार हे या टिमचे समन्वयक म्हणून काम पाहत आहेत.
या कार्यक्रमातंर्गत गुजरात राज्यातील स्वच्छ व सुंदर गावांच्या क्षेत्रभेटी व साबरमती येथे दिनांक 2 ऑक्टोबर रोजी होणा-या कार्यक्रमात नांदेड जिल्हा परिषदेची टिम सहभागी होणार आहे. या दौ-या दरम्यान गांधी स्मारकास भेट, नवरात्रोत्स कार्यक्रम तसेच मॉडेल गावांची क्षेत्रभेट होणार आहे. महाराष्ट्र राज्यातून अनेक जिल्हयातील प्रतिनिधीही या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
No comments:
Post a Comment