नियमांचे पालन करत अधिका-यांनी कामे केल्‍यास विकास कामात वृध्‍दी होते -मुख्‍य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांचे प्रतिपादन गट विकास अधिकारी समृध्‍दी दिवाणे यांना निरोप - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, September 30, 2019

नियमांचे पालन करत अधिका-यांनी कामे केल्‍यास विकास कामात वृध्‍दी होते -मुख्‍य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांचे प्रतिपादन गट विकास अधिकारी समृध्‍दी दिवाणे यांना निरोप



नांदेड :
जिद्द, चिकाटी व नियमांचे पालन करत अधिका-यांनी सर्व सामान्‍य जनतेची कामे केल्‍यास विकास कामात वृध्‍दी होते असे मत जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी व्‍यक्‍त केले. नांदेड पंचायत समितीच्‍या गट विकास अधिकारी समृध्‍दी दिवाणे यांना निरोप व गट विकास अधिकारी यू.डी. तोटावाड यांच्‍या स्‍वागताचा कार्यक्रम नांदेड पंचायत समितीच्‍या वतीने रविवार दिनांक 29 सप्‍टेंबर रोजी हॉटेल अथिती येथे घेण्‍यात आला त्‍यावेळी ते बोलत होते.

        मुख्‍य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्‍न झाला. यावेळी अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, जिल्‍हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्‍प संचालक नईम कुरेशी, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी व्‍ही.आर.कोंडेकर, डी.यू. इंगोले, व्‍ही.आर. पाटील, कार्यकारी अभियंता मुंडे, गट विकास अधिकारी समृध्‍दी दिवाणे, प्रभारी गट विकास अधिकारी यू.डी. तोटावाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

      पुढे ते म्‍हणाले, प्रत्‍येक अधिका-याची काम करण्‍याची एक हातोटी असते. अशीच हातोटी वापरत गट विकास अधिकारी समृध्‍दी दिवाणे यांनी त्‍यांच्‍या परिवेक्षाधीन काळात नांदेड पंचायत समितीमध्‍ये सहा महिन्‍याच्‍या कालावधीत त्‍यांनी सर्व कर्मचा-यांशी समन्‍वय ठेवून उत्‍तम प्रकारे कामे केली आहेत. अशीच कामे पुढील काळात नव्‍याने रुजू झालेले प्रभारी गट विकास अधिकारी यू.डी. तोटावाड यांनी करुन प्रत्‍येक योजनेत जिल्‍हयात नांदेड हा पहिल्‍या क्रमांचा तालुका ठरावा अशी अपेक्षा मुख्‍य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी व्‍यक्‍त कली.

     प्रांरभी मंचावरील उपस्थित मान्‍यवरांचा पंचायत समितीच्‍या वतीने शॉल व बुके देवून सत्‍कार करण्‍यात आला. त्‍यानंतर पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी व ग्रामसेवक युनियन, ग्रामसेवक संघ यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने गट विकास अधिकारी समृध्‍दी दिवाणे यांचा साडी-चोळी, शॉल श्रीफळ व बुके देवून मुख्‍य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांच्‍याहस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला. यावेळी मुख्‍य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी गट विकास अधिकारी समृध्‍दी दिवाणे यांना त्‍यांच्‍या भावी कार्यास शुभेच्‍छा दिल्‍या.

        गट विकास अधिकरी समृध्‍दी दिवाने आपल्‍या भावना व्‍यक्‍त करतांना म्‍हणाल्‍या, नांदेड तालुक्‍यात काम करतांना मला खुप काही शिकता आले. ग्रामसेवक व कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्‍याशी योग्‍य समन्‍वय ठेवून मी कामे केली आहेत. याचे सर्व श्रेय माझ्या अधिकारी व कर्मचा-यांना जाते. परिवेक्षाधीन कालवधीत नांदेड तालुक्‍यातील कामे करतांना नांदेड ही माझी कर्मभूमीच झाली आहे. नांदेडकरांनी माझ्यावर भरभरुन प्रेम केलं मी ते  कदापी विसरू शकणार नाही. संधी मिळाल्‍यास पुन्‍हा नांदेड जिल्‍हयात मला काम करण्‍यास आवडेल असेही त्‍या म्‍हणाल्‍या.

       याप्रसंगी अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी व प्रकल्‍प संचालक नईम कुरेशी, प्रभारी गट विकास अधिकारी यू.डी. तोटावाड यांची भाषणे झाली. तर ग्राम सेवक युनियनचे जिल्‍हाध्‍यक्ष ए.डी. कदम, ग्रामसेवक संघाचे आनंत सावंत, कार्याध्‍यक्ष धनंजय वडजे, सूर्यभान कपाळे यांनी मनोगत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विस्‍तार अधिकारी जीवन कांबळे यांनी केले. सुत्रसंचालन हनमंत वाडेकर तर उपस्थितांचे आभार मिलिंद व्‍यवहारे यांनी मानले. या कार्यक्रमाला सहाय्यक गट विकास अधिकारी अनिता सरोदे, बाल विकास प्रकल्‍प अधिकारी विजय बोराटे, डॉ. अमृत चव्‍हाण, तालुका आरोग्‍य अधिकारी डॉ. बालाजी मिरकुटे, विस्‍तार अधिकारी दिलीप बच्‍चेवार, सतिश लकडे, डी.के. आडेराघो, धनराज शिंदे, शाखा अभियंता राजेश जैवरी, बालाजी महाजन, शेख अहेमद, बालाजी पवार, संजय रामोड, संजय श्रिनेवार, सी.एम. बोडावार, धंजय वडजे, गोविंद माचेवाड, विलास वाघमारे, शिवकुमार डाकलवाले, मारोती वाघमारे,  शामसुंदर पाटील शिंदे, आर.एल. मुदखेडे, कनगुले, गणेश सर्पे, कमल तिडके, सिमा लाशनकर, सिमा मुगावकर, वैशाली गोणारकर, रुपाली मोरे, व्‍ही.पी. कोकरे, प्रेरणा धांडे यांच्‍यासह पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी व ग्रामसेवक यांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News