नांदेड :
कर्मचा-यांच्या सुप्त साहित्यिकीक प्रतिभेस वाव मिळावा यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी आमची प्रतिमा हा अभिनव उपक्रम जिल्हा परिषदेत सुरु केला आहे. यानिमित्ताने जिल्हा परिषदेतील कवि, लेखक, साहित्यिकांना व्यक्त होण्यासाठी हक्काचा मुक्तमंच मिळाला आहे,
विजयादशमी दिनी म्हणजेच आठ ऑक्टोबर रोजी आमची प्रमिमा या उपक्रमाचा शुभारंभ जिल्हा परिषदेमध्ये करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीमध्ये प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूला सामान्य प्रशासनाच्या सूचना फलकावर आमची प्रतिमा नावाचा उपक्रम चालणार आहे. या उपक्रमात पहिल्यांदाच हदगाव तालुक्यातील वाळकी येथील जिल्हा परिषद शाळेचे सहशिक्षक उमेश सांगवीकर यांच्या परिजात मनी ठसावा ही कविता या फलकावर झळकण्याचा मान मिळाला आहे.
अधिकारी व कर्मचारी यांना साहित्याची आवड आहे. ते कविता, कथा यासारख्या साहित्याचे लेखन करीत असतील परंतु त्यांच्या कलाकृतीला वाव देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून आमची प्रतिमा हा अभिनव उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या फलकावर जिल्हा परिषदे अंतर्गत जिल्हयातील सर्व अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, ग्रामसेवक, परिचर, सर्व संवर्गातील कर्मचारी तसेच कंत्राटी कर्मचारी यांचेसाठी हा खुला मंच उपलब्ध करुन देण्यात आला आहे. साहित्य प्रकारातील स्वरचित कवितांचा या उपक्रमात समावेश करण्यात आला आहे. सोशल मिडीयातील व्हॉट्सअप, ट्वीटर, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून कवित्व करणा-या कर्मचा-यांच्या कविता आता आमची प्रतिमा या उपक्रमात झळकणार आहेत.
जिल्हा परिषदे अंतर्गत सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी आपल्या स्वरचित कविता लिहून या उपक्रमासाठी पाठवावेत असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी केले आहे. यानिमित्ताने साहित्यिकांना वाव मिळून त्यांच्या चांगल्या कविंतांची ओळख होणार असल्याचे मत श्री काकडे यांनी व्यक्त केले.
No comments:
Post a Comment