किनवट :
" न्याय आपल्या दारी पंधरवाड्या " निमित्त राबविलेल्या विविध उपक्रमाचे छाया वृतांकन केल्याबद्दल शुक्रवारी ( दि. २२ ) रोजी पंचायत समिती, सभागृहात संपादक साजीद बडगुजर यांना ' प्रशस्ती -पत्र ' बहाल करून दिवाणी न्यायाधीश मा. जहांगीर र.पठाण यांनी गौरव केला.
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण अधिनस्त तालुका विधी सेवा समितीच्या वतीने दि. नऊ ते २४ नोव्हेबर या कालावधीत " न्याय आपल्या दारी पंधरवाडा " साजरा करण्यात आला. यानिमित्त बालक दिन, विधी साक्षरता महाफेरी, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा व विधी ( कायदा ) साक्षरता शिबीर आदि उपक्रमाचे आयोजन केले होते. प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी पूर्णवेळ उपस्थित राहून या उपक्रमाचे यशस्वीपणे छाया वृतांकन करुन "सर्वांसाठी न्याय " ही संकल्पना सर्व सामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी केलेल्या धडपडीबद्दल शासनमान्य जाहिरात यादीवरील साप्ताहिक लोकादेशचे अधिस्विकृतीधारक संपादक साजीद बडगुजर यांना तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश (क. स्तर ) जहांगीर र.पठाण यांनी ' प्रशस्ती - पत्र ' बहाल करुन गौरविले.
यावेळी सहदिवाणी न्यायाधीश मा.जे.एन. जाधव, वकील संघाचे उपाध्यक्ष अॅड. मिलिंद सर्पे, सहसचिव अॅड. राहूल सोनकांबळे, उप विभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक, विधी सेवा समिती सदस्य निवृत्त प्राचार्य वि. मा. शिंदे, के. मूर्ती, पोलिस निरीक्षक मारोती थोरात व विधी सेवा समिती सचिव तथा गट विकास अधिकारी सुभाष धनवे हे प्रमुख अतिथी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment