नांदेड :
सैनिकी विद्यालय सगरोळीच्या वतीने व भारत सरकारद्वारा प्रमाणित मुंबई येथील अग्रगण्य व प्रसिद्ध वी. एम्. एस्. शिपिंग कंपनी प्रा. लि. यांच्या सहकार्याने दि. १० व ११ जानेवारी रोजी १०वी, ११वी व १२ वी तील विद्यार्थ्यांसाठी मर्चंट नेव्ही' व्यवसाय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
इ.१२ वी नंतर विद्यार्थ्यांना करीअर करण्यासाठी (बहुतेक वेळा पालकांच्या) आवडीचे क्षेत्र निवडताना अनेकवेळा संभ्रम निर्माण होऊन चुकीचे क्षेत्र निवडले जाते आणि त्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
विशेषत: मराठवाड्यातील विद्यार्थी व पालक यांच्या कडून दुर्लक्षिले गेलेले भारतीय सागरी व्यवसाय व उद्योग क्षेत्र( 'मर्चंट नेव्ही') ही सदर विद्यार्थ्यांना यशस्वीपणे करीअर करण्यासाठी खुप मोठी संधी म्हणून पाहणे अत्यंत गरजेचे आहे.
याच निमित्ताने दि.१० व ११ जानेवारी रोजी सैनिकी विद्यालय, सगरोळी येथे विद्यार्थी व पालक यांच्या साठी भारतीय सागरी व्यापार-व्यवसाय व उद्योग ( 'मर्चंट नेव्ही' ) क्षेत्रातील करिअरच्या संधी या विषयावर सामुहिक व वैयक्तिक मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी मुंबई येथील या क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या वी एम् एस् शिपिंग कंपनीतील अधिकारी व तज्ञ प्रशिक्षकांना सैनिकी विद्यालयाच्या वतीने निमंत्रित करण्यात आले आहे.
या शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांना दि. १० रोजी दुपारी २ ते ५ या तीन तासांच्या सत्रात भारतीय सागरी वाहतूक व्यापार-व्यवसाय उद्योग क्षेत्रातील करिअरच्या संधी याविषयी सविस्तर माहिती देण्यात येणार असून दि. ११ व १२ रोजी वैयक्तिक पातळीवर विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन पालकांसमक्ष मार्गदर्शन (काउन्सिलिंग) केले जाणार आहे. तसेच, यातून निवडलेल्या विद्यार्थ्यांना इ. १२वी नंतर प्रशिक्षणासाठी बोलावण्यात येणार असून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी साठी प्लेसमेंट देण्यात येणार आहे. या शिबिरासाठी सदर कंपनीचे संचालक श्री विकेश उपाध्याय त्यांच्या सहकाऱ्यांसह उपस्थित राहणार आहेत.
यासाठी परीसरातील इच्छुक विद्यार्थी व पालक यांनी सदर शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होऊन संधीचा लाभ घ्यावा असे प्राचार्यांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.
निवासी राहू इच्छिणाऱ्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांची नाममात्र शुल्कासह व्यवस्था करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment