नांदेड :
शिवांजली अपार्टमेंट, सिंधी कॉलनी, नवामोंढा परिसर, नांदेड येथील रहिवाशी मातोश्री जयवंताबाई चांदू अंबाळकर (बिऱ्हाडे) यांचे मंगळवारी ( दि. ७ जानेवारी २०२० रोजी ) सकाळी ८ वाजता वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी निधन झाले .
त्यांच्या पार्थिवावर बुधवारी ( दि. ८ जानेवारी रोजी ) सकाळी ११:३० वाजता गोवर्धनघाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचे पश्चात एक मुलगा, सात मुली, सुन, जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे.
सिनेकलावंत तथा प्रसिद्ध फिजिशियन डॉ. प्रमोद अंबाळकर (बिऱ्हाडे) यांच्या त्या मातोश्री होत.
No comments:
Post a Comment