व्यंग चित्रकार प्रा. प्रमोद दिवेकर यांचे निधन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, January 15, 2020

व्यंग चित्रकार प्रा. प्रमोद दिवेकर यांचे निधन





नांदेड:
राजेशनगर तरोडा येथील सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार प्रा. प्रमोद विठ्ठलराव दिवेकर यांचे बुधवारी दिनांक १५ जानेवारी २०२० रोजी पहाटे १-३५ वाजता नांदेड येथील एका खाजगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. ते ५० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई वडील, ३ भाऊ, १ बहीण, पत्नी, २ मुली असा मोठा परिवार आहे.
           प्रमोद दिवेकर यांनी विविध वृत्तपत्रांमध्ये व्यंगचित्रांच्या माध्यमातून आपला वेगळा ठसा उमटवला होता. नांदेडच्या एम.जी.एम. फाईन आर्ट महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणूनही त्यांनी काही काळ काम पाहिले. सिद्धहस्त चित्रकार म्हणून ते उभ्या मराठवाड्याला सुपरिचित होते. अनेक दिग्गज लेखकांच्या पुस्तकांना प्राचार्य प्रमोद दिवेकर यांनी मुखपृष्ठ दिलेले आहेत.   सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. रविचंद्र हडसनकर यांचे ते भाचे व दैनिक सत्यप्रभा या वृत्तपत्राचे उपसंपादक मिलिंद दिवेकर यांचे ते धाकटे  बंधू होत. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी १ वाजता नांदेड येथील गोवर्धनघाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.  अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News