'भारताचे रक्षणकर्ते महामानव डाॅ. बाबासाहेब अांबेडकर आणि भारतीय संविधान ' या महाकाव्यग्रंथासाठी कविता पाठवा - प्रा. अशोककुमार दवणे - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, January 30, 2020

'भारताचे रक्षणकर्ते महामानव डाॅ. बाबासाहेब अांबेडकर आणि भारतीय संविधान ' या महाकाव्यग्रंथासाठी कविता पाठवा - प्रा. अशोककुमार दवणे



नांदेड :
' भारताचे रक्षणकर्ते महामानव डाॅ. बाबासाहेब अांबेडकर आणि भारतीय संविधान ' या नावाने एक महाकाव्यग्रंथ प्रसिद्ध करीत आहोत. यासाठी सर्जनशील कवींनी महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर किंवा भारतीय संविधानावर स्वलिखीत एक कविता पाठवावी असे आवाहन संपादक प्रा. अशोककुमार दवणे यांनी केले आहे.

               प्रा. दवणे यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची बांधिलकी असलेल्या २०१२ कवितांचा  महाकाव्यग्रंथ २०१२ मध्ये प्रकाशित केला. समग्र आंबेडकरवाद्यांनी या महाकाव्यग्रंथाचे कौतुक केले. एकट्याच्या २०१२ कविता प्रसिद्ध केल्या तर हा महाकाव्यग्रंथ अधिक सर्वसमावेशक होईल यादृष्टीने २०१२ पासून प्रयास होता.
            ह्या भरीव यशानंतर शब्ददान प्रकाशन, नांदेडचे प्रकाशक / संपादक प्रा.अशोककुमार दवणे 'भारताचे रक्षणकर्ते महामानव डाॅ. बाबासाहेब अांबेडकर आणि भारतीय संविधान ' या नावाने एक महाकाव्यग्रंथ प्रसिद्ध करणार आहेत. यासाठी सर्जनशील कवींनी महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर किंवा भारतीय संविधानावर स्वलिखीत एक कविता  संपादक प्रा. अशोककुमार दवणे यांना (9890381958 ) या क्रमांकावर  व्हाॅटसअॅप करावी. दहा हजार कवींच्या कवितांचा समावेश असलेला हा महाकाव्यग्रंथ राष्ट्राचे भूषण ठरणार आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News