किनवट :
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासोबतच कलात्मक विकास व्हावा हा उद्देश ठेवुन जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा मोहपुर, दिग्रस व कोपरा येथे आयोजित कला महोत्सव विद्यार्थ्यांच्या बहारदार नृत्याने उत्साहात साजरा करण्यात आला.
जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा, मोहपूर
शालेय शिक्षण समीतीचे अध्यक्ष दिगांबर खुडे अध्यक्षस्थानी होते ; तर पपंचायत समिती सदस्य निळकंठ कातले, केंद्र प्रमुख प्रकाश होळकर, शालेय व्यवस्थापन समीतीचे सदस्य धरत्रीनाथ शिरडे, नारायण सरकुंडे, मोहपूरचे पोलीस पाटील प्रदीप सोनटक्के, बेल्लोरीचे शंकर हेडावु, पांधरा पोलिस पाटील बारापात्रे शालेय व्यवस्थाप समीती मोहपुर चे सर्व सदस्य , मोहपुर ग्राम पंचायत पदाधिकारी व सदस्य, सिंदगी तांडा शाळेचे मुख्याध्यापक पदमाकर कवटीकवार हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
यावेळी सादर केलेल्या २५ समूह नृत्यातून वरिष्ठ गटात जि.प. कें.प्रा. शाळा मोहपुर यांनी तर लहान गटात जि.प.प्रा. शाळा आंजी या शाळेंनी प्रथम क्रमांक पटकावून बाजी मारली.
या स्पर्धेत मोठ्या गटात प्रथम पारितोषीक ११०१/ केंद्रप्रमुख प्रकाश होळकर , द्बितीय ७०१/कृष्णकांत संकुलवाड ,तृतीय ५०१/आशिष बोरकर (माने) याच्यांकडुन तर लहान गटात प्रथम १५०१/ पदमाकर कवटीकवार मु.अ. सिंदगी तांडा, द्वितीय ११०१/ रमेश आंधळे केंद्रिय मुअ मोहपुर , तृतिय ७०१/ रविंद्र चौधरी मु.अ. आंजी, प्रोत्साहपर ५०१/ सदानंद अचकुलवार मुअ सिंदगी गाव, ५०१/ विकास राठोड सिंदगी तांडा , ३०१/ विठ्ठल झाडे स.शि. बेल्लोरी (ज), ३०१/ कृष्णकांत संकुलवाड शिक्षक कोठारी. यांच्याकडुन देण्यात आले.
यास्पर्धेसाठी परिक्षक म्हणून अंकुश राऊत , सुर्यकांत शहाने, अविनाश दासरवार व अतुल मुलगीर यांनी काम पाहिले.
मोहपुर शाळेचे मुख्याध्यापक रमेश आंधळे यांनी प्रास्ताविक व जितेंद्र आमटे यांनी सूत्रसंचालन केले. राहुल तामगाडगे यांनी आभार मानले.
मोहपूर शाळेचे शिक्षक सुभाष सोनटक्के, गणपत किनाके , वासुदेव राजुरकर, सिंदगीगाव मुख्याध्यापक सदानंद अचकुलवार, आंजी मुख्याध्यापक रविंद्र चौधरी, पांधरा मुख्याध्यापक राठोड, बेल्लोरी मुख्याध्यापक ऐटवार , खेडीचे मुख्याध्यापक आकाश थोटे आदिंसह केंद्रातील सर्व सहशिक्षक गड्डमवार, संगिता भवरे, मानकरी, शशिकांत कांबळे, विठ्ठल झाडे, संग्राम झुडपे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिग्रस
विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आगेकूच करीत असलेल्या किनवट तालुक्यातील थारा केंद्रा अंतर्गत जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा दिग्रस येथे भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विध्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा सांस्कृतिक कार्यक्रम कलातरंगचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सरपंच सौ.रुक्मिणीबाई वायकोळे तर उदघाटक म्हणून माजी उपसभापती गजानन कोल्हे पाटील हे होते.
कार्यक्रमाला सुरेश सोळंके पाटील,केंद्रप्रमुख बाळासाहेब कदम, उपसरपंच श्रीमती कौशल्याबाई पवार,केंद्रीय मुख्याध्यापक साईबाबा शिंदे,अंतर्गत मुख्याध्यापक इंगळे,मोदे, राठोड,वाकोडे आदींची उपस्थिती लाभली होती.
सदरील कार्यक्रमच्या प्रारंभी मान्यवरांचे स्वागताअंती प्रस्तुत शाळेत शिकून विविध खात्यात शासकीय सेवेत रुजू झालेल्या माजी विध्यार्थ्यांचा शाल ,श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमात प्रस्तुत शाळेच्या विध्यार्थ्यांनी भारतमातेचे दर्शन घडवून गोंडी गीत,बालगीत यासह शाळेच्या शिक्षिका श्रीमती वैशाली यलमटे यांच्या लेखनातील नाटिका लेक वाचवा लेक शिकवा यामधून स्त्री शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. अत्यंत सुंदर शैलीने सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक राजीव बैलके यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक ग.नु.जाधव, शिक्षक देविदास येरवाळ, सतिष मठदेवरू,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजाराम जाधव शिक्षणप्रेमी नागरिक शिवाजी जाधव पाटील,पप्पू आरमाळकर आदींचे सहकार्य लाभले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोपरा
किनवट तालुक्यातील कोपरा येथील जिल्हा परिषद शाळेच्या वतीने बहारदार सांस्कृतीक कार्यक्रम घेण्यात आला. सायंकाळी जवळपास पाच तास रंगलेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचा अविष्कार सादर केला.यावेळी देशभक्तीपर गीते, कोळीगीते, शेतकरी गीते, हिंदी मराठी चित्रपटातील गीते, लावणी अशा अनेक गीतांच्या तालावर शाळकरी मुलामुलींनी नृत्य सादर केले. या सांस्कृतिक कार्यक्रमाने प्रफुल्लीत होऊन गावकऱ्यांनी शाळा डिजीटल करण्यासाठी लोकवाटा म्हणून वीस हजार रुपयांची बक्षिसी दिली.
शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्ता मामीलवाड अध्यक्षस्थानी होते तर,प्रमुख अतिथी म्हणून सरपंच सीताबाई मडावी, केद्रंप्रमुख देगावे , राकाशिपचे जिल्हा कोषाध्यक्ष पी के मुंगलसर, पदोन्नत मुख्याध्यापक पी. एस. मुंड, कल्याणकर, जाधव व तिडके आदिंची उपस्थिती होती.
देवेंद्र क्षिरसागर यांनी सूत्रसंचालन केले. शेख यांनी आभार मानले.मुख्याध्यापक एस.बी. डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पेंदोर, मेंडके, नोळे,इनामदार, श्रीमती कुंटलवाड आदि शिक्षकांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
गावातील महिला व पुरूषांनी मोठ्या संख्येने हजर राहून बालकलाकारांच्या कलाविष्काराचा आस्वाद घेतला.






No comments:
Post a Comment