किनवट :
आदिवासी समाजाच्या समस्या शासन व प्रशासनाच्या निदर्शनास आणून देऊन पाठपुरावा करण्यासाठी आदिवासी शिष्टमंडळाची निर्मिती करण्यात आली असून या शिष्टमंडळाने सोमवार, दि.१०फेब्रुवारी रोजी गोकुंदा ,किनवट येथील एकात्मिक प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची भेट घेतली.
या बैठकीत प्रकल्प स्तरावरील महत्वाच्या विषयावर प्रकल्प अधिकारी व शिष्टमंडळ यांच्यात सकारात्मक चर्चा करण्यात आली असून याचा आदिवासी समाजाला भविष्यात फायदा होण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे यावेळी प्रकल्प अधिकारी यांनी सांगितले. आदिवासी समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल शिष्टमंडळाने प्रकल्प अधिकारी गोयल यांचे आभार मानले.
आदिवासी समाजाच्या या शिष्टमंडळात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आनंदराव डोखळे, सेवानिवृत्त जिल्हा नियोजन अधिकारी उत्तमराव फोले, बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष जयवंत वानोळे, आदिवासी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गंगाधर वानोळे, सेवानिवृत्त तहसीलदार डी. के. डुकरे व आदिवासी कर्मचारी संघटनेचे सचिव रामदास आमले यांचा समावेश होता.




No comments:
Post a Comment