किनवट :
किनवट तालुक्यातील गणेशपूर (जुने ) जिल्हा परिषद शाळेच्या चिमुकल्यांची चिखल मातीत आयुष्य वेचनाऱ्या श्रमिकांच्या विटभट्टी व जलशुध्दीकरण प्रकल्पाला क्षेत्रभट निसर्ग सहलीचे आयोजन करण्यात आले होते.
गणेशपूर (जुने ) शाळेतील विद्यार्थ्यांनी गावाजवळच असलेल्या विटभट्टी व जल शुध्दीकरण प्रकल्पाला भेट दिली. विटभट्टी ठिकाणी मातीपासून चिखल बनवून पक्की विट कशी बनवली जाते ही संपूर्ण प्रक्रिया प्रात्यक्षीकासह विदयार्थ्यांनी अनुभवली. विटभट्टीचे मालक माजी सैनिक बालाजी पुठवाड यांनी लागणारे भांडवल व मिळणारा नफा याचे गणित सोप्या शब्दात विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. यावेळी पुठवाड यांचे बंधू शंभू पुठवाड यांनी सर्व विदयार्थ्यांना चॉकलेट वाटप दिले .
त्यानंतर येथून जवळच असणाऱ्या जल शुद्धीकरण प्रकल्पाला भेट दिली असता पाणी शुद्ध कसे केले जाते. त्यासाठी कोणत्या यंत्राचा वापर होतो व शुध्द झालेले पाणी शितगृहात कसे पाठवून त्याला थंड केले जाते. याची माहिती जलशुद्धीकरण प्रकल्पाचे मालक प्रकाश रांदड
यांनी दिली. सर्व विदयार्थ्यांना थंड पाणी प्यायला दिले .
त्यानंतर सर्व विद्यार्थी गावाच्या शेजारीच असलेल्या हिरव्यागार शेतशिवारात पोहचले. तेथे त्यांनी शेती प्रक्रियेची माहिती घेतली. पाणी बचतीसह शेती कशी करावी हे ठिबक सिंचनाच्या माध्यमातून समजून घेतले. त्यानंतर स्नेहभोजन केले. विद्यार्थ्यांनी डब्यात छान छान जेवन आणले होते. तसेच शाळेकडून उपलब्ध केलेल्या खिचडी व जिलबीचा आस्वाद त्यांनी घेतला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण पिल्लेवार, सह शिक्षिका ऊर्मिला परभणकर, अंगणवाडी सेवीका कल्पना गाडे यांनी हा उपक्रम यशस्वी केला. आनंदाने उत्साहाने बागडत खेळत विद्यार्थ्यांनी अंताक्षरी, नाटक व नृत्य मनसोक्त धमाल करून छान वातावरणात निसर्ग सहल्ल्या आनंद लुटला.




No comments:
Post a Comment