नांदेड :
शिक्षकांच्या कलागुणांना वाहिलेल्या अखिल भारतीय शिक्षक साहित्य, कला-क्रीडा मंचच्या उपक्रमांतर्गत राज्यातील फक्त शंभर शिक्षक कवी -कवयित्रींचा प्रातिनिधीक कवितासंग्रह होणार असून त्यासाठी जास्तीत जास्त शिक्षक शिक्षिकांना कविता पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
स्वलिखित दर्जेदार दोन कविता, अल्पपरिचय (नाव, शाळा, शिक्षण, प्रथम नेमणूक, असेल तर प्रकाशित अप्रकाशित साहित्य, मिळालेले पुरस्कार) आदींचा समावेश त्यात राहणार असून जास्तीत जास्त शिक्षक कवीमित्रांनी आपल्या कविता रमेश मुनेश्वर (7588424735), नासा येवतीकर (9423625769), विरभद्र मिरेवाड (9158681302), व मिलिंद जाधव (9423902450) यांना व्हाट्सअॅप कराव्यात. योग्य साहित्यास संग्रहात स्थान देण्यात येईल. तसेच सहभागींना प्रमाणपत्र सुद्धा देण्यात येईल असे संपादकीय मंडळाने सांगितले आहे.
"शिक्षक एक अष्टपैलू असतो, तो लिखान करतो पण प्रसिद्धी मिळत नाही. तसेच अध्यापनात एवढा वेळ जातो की तो आता स्वतःसाठी लिहिणे सुद्धा विसरला आहे. तेव्हा त्यांची स्वनिर्मिती जागवावी. या मुख्य उद्देशाने हा प्रकल्प आम्ही हाती घेतला आहे. शिक्षक कवींचा प्रतिसादही चांगला मिळत असल्याचे संपादक तथा राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक रमेश मुनेश्वर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.




No comments:
Post a Comment