नांदेड :
लॉर्ड बुद्धा टी.व्ही.चे नांदेड जिल्हा प्रतिनिधी सदाशिव गच्चे यांना युगंधर क्रिएशन नागपूर, वंदनासंघ दीक्षाभूमी, नागपूर व लॉर्ड बुद्धा मैत्रीसंघ नागपूरच्या वतीने नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर माजी समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले व लॉर्ड बुध्दा टी.व्ही.चे मुख्य संपादक भैय्याजी खैरकर, सचिन मून यांच्या हस्ते व देविदास घोडेस्वार, ज्येष्ठ पत्रकार एस.एन.विनोद, ज्येष्ठ पत्रकार गजानन निमदेव, बबन वाळके, डॉ. प्रदीप आगलावे, डॉ.बबनराव तायवाडे, उद्योजक सी. आर. सांगलीकर, दिक्षाभूमी स्मारक समितीचे विलास गजघाटे, गोविंद पोतदार, राजेश काकडे, ऍड.सुनील सौंदरमल, राहुल रंगारी यांच्या प्रमुख उपस्थितीत यावर्षीचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय पत्रकारीता पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
सदाशिव गच्चे यांना बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल मराठी पत्रकार परिषद मुंबईचे विभागीय सचिव प्रकाश कांबळे, नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सचिव सुभाष लोणे, नमस्कार महाराष्ट्रचे संघरत्न पवार, स्वामी रामानंद विद्यापीठ माध्यम संकुलाचे प्रा.राजेंद्र गोणारकर, महाराष्ट्र राज्य पर्यावरण व प्रर्दुषण नियंत्रण मंडळ,मंत्रालय,मुंबईचे उपविभागिय अधिकारी प्रमोद लोणे, लहानकर, शिक्षक व कर्मचारी संघटनेचे केंद्रीय जिल्हाध्यक्ष बालासाहेब लोणे, सरचिटणीस निलेश गोधने, साहित्यिक भीमराव हाटकर, राहुल जोंधळे, महाविहार परिवाराचे साहेबराव पुंडगे आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.





No comments:
Post a Comment